Crime News  saam tv
क्राईम

Shocking News : धक्कदायक! वर्क लोड आला म्हणून नर्सने केली १० रुग्णांची हत्या, नेमकं काय प्रकरण?

Germany Crime News : जर्मनीत हॉस्पिटलमध्ये वर्क लोड आणि मानसिक ताण वाढल्याने एका नर्सने १० रुग्णांना जास्त प्रमाणात औषधं देऊन ठार केलं. पोलिसांनी तिला अटक केली असून न्यायालयाने तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Alisha Khedekar

जर्मनीतील वुर्सेलेन येथे नर्सने १० रुग्णांना ठार केल्याची भीषण घटना

कामाचा ताण आणि मानसिक दबावामुळे नर्सने घेतलं टोकाचं पाऊल

पोलिस तपासात नर्सने आणखी २७ जणांना मारण्याची तयारी केली होती हे उघड

न्यायालयाने आरोपी नर्सला जन्मठेपेची शिक्षा सुनावली

तुम्हाला देखील ऑफिसमध्ये किंवा अन्य कामाच्या ठिकाणी वर्क लोड येत असेल बरोबर ना? कामाचा भार हलका व्हावा यासाठी तुम्हीकाहीतरी सुवर्णमध्य काढत असाल. मात्र एका हॉस्पिटलमधील नर्सने कामाचा लोड आल्याने १० जणांचा जीव घेतला. शिवाय ही नर्स आणखी २७ जणांना मारण्याच्या तयारीत होती. सदर घटना ही जर्मन मध्ये घडली आहे. याप्रकरणी नर्सला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम जर्मनीतील वुर्सेलेन शहरातील एका रुग्णालयात जेमेनिया ( बदललेले नाव ) नावाची तरुणी नर्स म्हणून काम करत होती. तिने २००७ मध्ये तिचे नर्सिंग प्रशिक्षण पूर्ण केले होते . जेमेनिया २०२० पासून रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत होती. एके दिवशी तिच्यावर हॉस्पिटलमधील कामाचा लोड आला.

कामाचा लोड आल्याने तिची चिडचिड होऊ लागली. सतत तेच तेच काम आणि हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांची बोलणी ऐकून ती संतापली. शेवटी तिने हॉस्पिटलमधील रुग्णांना जीवे मारण्याचे ठरवले. म्हणून तिने रात्रीच्या ड्युटीवर असताना वृद्ध रुग्णांना मोठ्या प्रमाणात वेदनाशामक आणि झोपेची अतिरिक्त औषधे दिली . रुग्णांना लवकर झोप लागावी आणि रात्रभर काम करावे लागू नये, हा त्या नर्सचा उद्देश होता .

सतत होणाऱ्या अतिरिक्त गोळ्यांच्या माऱ्याने १० जणांचा मृत्यू झाला. एकापाठोपाठ होणाऱ्या मृत्यूने हॉस्पिटलच्या परिसरात गोंधळ निर्माण झाला. यानंतर डॉक्टरांना याप्रकरणात संशय आल्याने याची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केल्यावर त्यांच्या तपासात ही बाब समोर आली.

पोलिसांनी या प्रकरणी नर्सला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी म्हटले की सदर तरुणीला वर्क लोड असल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले आहे. ती आणखी २७ जणांना मारण्याच्या प्रयत्नांत होती मात्र तिचा हा प्रयत्न असफल ठरला आहे. मात्र तिने निष्पाप १० जणांचा जीव घेतला आहे. न्यायालयाने तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT