Pune Crime yandex
क्राईम

Pune Crime: घरगुती सिलेंडरमधून गॅस चोरी, पुणे पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Crime News: पोलिसांना लोणी काळभोर येथील महादेव मंदिराजवळ साईसृष्टी बिल्डिंगच्या मागील गोठ्यात एक इसम घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस काढून बेकायदा विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती.

Dhanshri Shintre

लोणी काळभोर येथील महादेव मंदीराजवळ असलेल्या साईसृष्टी बिल्डींग पाठीमागील एका गोठ्यामध्ये एक इसम घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस काढून बेकायदा विक्री करीत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. गुन्हे शाखा युनिट 6 व लोणी काळभोर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. तेव्हा मदन बामने हा अवैधरित्या गॅस भरताना आढळून आला.

या छाप्यात पोलिसांनी 31 हजार 900 रुपये किंमतीच्या एचपी कंपनीच्या 11 कमर्शिअल गॅस टाक्या, 17 हजार 150 रुपये किंमतीच्या इंडेन कंपनी 7 घरगुती गॅस टाक्या, 13 हजार रुपये किमतीच्या पुष्पा कंपनीच्या 9 घरगुती वापराच्या रिकाम्या गॅस टाक्या, 51 हजार 450 रुपये किंमतीच्या 21 एचपी कंपनीच्या घरगुती गॅस वापराच्या टाक्या, 19 हजार 450 रुपये किंमत असलेल्या एचपी कंपनीच्या 21 घरगुती वापराच्या रिकाम्या गॅस टाक्या जप्त करण्यात आले आहे.

14 हजार 700 रुपये किंमतीच्या रिलायन्स कंपनीच्या 6 घरगुती वापराच्या गॅस टाक्या, 3 हजार 500 रुपये किंमतीच्या 2 एचपी कंपनीच्या लहान गॅस टाक्या, 86 हजार रुपये किंमतीच्या एकून 86 लहान वेगवेगळ्या लोकल कंपनीच्या गॅस टाक्या, 500 रुपये किंमतीचे एकूण 5 नग गॅस ट्रान्सफर करण्याचे लोखंडी नोझल, 200 रू चे एक पितळी नोझल, २ हजार रुपये किंमतीचे रेग्युलेटर पाईप साडेतीन हजारांचा एक इलेक्ट्रीक वजनकाटा असा एकूण सुमारे 2 लाख 24 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी आरोपी मदन बामने याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, अनधिकृत भरलेले गॅस सिलेंडर हे लोणी काळभोर येथील त्याच्या जय मल्हार गॅस सर्व्हिस या दुकानात ठेवून ग्राहकांना विक्री करीत असल्याची पोलिसांना कबुली दिली आहे. याप्रकरणी आरोपीच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार! २ महत्त्वाच्या शहरांना जोडणार; जाणून घ्या 'A टू Z' माहिती

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT