क्राईम

Gadchiroli Crime: जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात संशयास्पद स्थितीत आढळला युवतीचा मृतदेह

Gadchiroli Crime: गडचिरोली येथील कुरखेडामधील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात एका युवतीचा मृतदेह आढळून आलाय.

Bharat Jadhav

मंगेश भांदेकर , साम प्रतिनिधी

बदलापूरच्या घटनेमुळे सध्या राज्यभरात संताप व्यक्त केला जातोय. दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारीवरून नागरिक संतप्त झालेत. अशात गडचिरोलीच्या कुरखेडा येथे एका मुलीची हत्या झाल्याची घटना घडलीय. येथील जिल्हा परिषद शाळा आवार परिसरात एका युवतीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. ज्योती उर्फ चांदनी मसाजी मेश्राम असे युवतीचे नाव आहे.

शनिवारी काही युवक क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात गेले असता भिंतीला लागून एका युवतीचा मृतदेह दिसून आला. या घटनेची माहिती पसरताच बघ्यांची एकच गर्दी झाली. उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले, कुरखेडाचे ठाणेदार महेंद्र वाघ यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केलाय. प्राथमिक तपासात युवतीचा मृत्यू नेमका कश्यामुळे झालं हे सांगता येत नसल्याचे मत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय.

मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. मृतक युवतीच्या आईच्या म्हणण्यानुसार, मुलगी काल रात्री 10 वाजताच्या दरम्यान घराबाहेर गेली होती. ती उशिरापर्यंत घरी परत न आल्याने तिचा शोध घेतला असता मिळाली नाही. सकाळी तिच्या मृत्यूची बातमी कळताच मृतकच्या आईने एकच हंबर्डा फोडला. काही दिवसा पूर्वी एका दुर्घटनेत मुलगा गमावलेल्या आईवर या घटनेने संकट कोसळले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT