Gadchiroli Crime witchcraft saam tv
क्राईम

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

Gadchiroli Crime witchcraft: जादूटोणा करत असल्याच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोन जणांना जिवंत जाळल्याची घटना घडलीय. याप्रकरणात पोलिसांनी १५ जणांना अटक केलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गडचिरोली : जादूटोण्याच्या संशयावरून काही गावकऱ्यांनी मिळून महिलेसह दोन जणांना जिवंत जाळल्याची घटना घडलीय. याप्रकरणी १५ जणांना अटक करण्यात आलीय. हा संतापजनक प्रकार गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्याच्या बार्सेवाडा येथे घडलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, जमनी तेलामी ( वय ५३), देऊ आतलामी (६०) अशी मृतांची नावे असून याप्रकरणी १५ जणांना अटक करण्यात आलीय. एटापल्ली तालुक्यातील बार्सेवाडा येथील जमनी आणि देऊ हे दोघे जादूटोणा करीत असल्याचा संशय काही गावकऱ्यांना होता. या संशयातून गावकऱ्यानं १ मे रोजी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास गावकऱ्यांनी एकत्र येत दोघांना निर्दयीपणे मारहाण केली. त्यानंतर मरणासन्न अवस्वथेत असलेल्या दोघांना ओढत नेत रात्री १० वाजण्याच्या सुमारास गावाबाहेरील नाल्यात पेटवून दिलं.

दुसऱ्या दिवशी उशिरापर्यंत याविषयी कुणालाच माहिती नव्हती. दरम्यान, पोलिसांना कुणकुण लागताच त्यांनी तपासाची चक्रे फिरवली. त्यानंतर या गुन्ह्याचा उलगडा केला. मृतदेह जाळल्याच्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. दोघांच्या मृतदेहांचा कोळसा झाला होता. याप्रकरणी गावातील एकूण १५ जणांना अटक करण्यात आलीय. दरम्यान या गुन्ह्यात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

डाकिन असल्याच्या संशयावरून महिलेला बेदम मारहाण

नंदुरबारमध्येही अशीच एक घटना घडली होती. यात एका महिलेला डाकिन समजून मारहाण करण्यात आली होती. एका आदिवासी महिलेला डाकिन असल्याच्या संशयावरून मारहाण झाली होती. मारहाण करणाऱ्या पती-पत्नी विरोधात जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार, धडगाव तालुक्यातील तलावडी शिवार पाडा येथे डाकिन असल्याची अफवा पसरली होती. याच अफवेतून तलावडी गावात शिवार पाडा येथील एका ३२ वर्षीय आदिवासी महिलेला मारहाण झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT IPL 2026 Final: कोण जिंकणार आयपीएल २०२६चा कप? RCB आणि GT मधील महसंग्राम कुठे, केव्हा आणि कसा पहाल?

Maharashtra Farmer Loan : १० दिवसांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, राज्यसरकारची मोठी घोषणा

Actress Bath Video Leak: अभिनेत्रीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ लीक', टिव्ही शोमध्ये घडला भयानक प्रकार

Maharashtra News Live Update: 10 दिवसांत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार - मंत्री दत्ता भरणे

भररस्त्यात खासदाराला मारहाण; शर्ट फाडून खाली पाडले, धक्कादायक व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT