Pune Crime News Saam Tv
क्राईम

Pimpari Crime News : पिंपरी पोलिसांचा गुन्हेगारांना दणका! अल्पवयीन मुलांकडून बंदूक आणि काडतुसे केली जप्त, नेमकं काय घडलं?

Pune Crime News : पिंपरीत पोलिसांनी चार अल्पवयीन गुन्हेगारांच्या ताब्यातून चार देशी पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. मध्य प्रदेशातून शस्त्रसाठा आणल्याची कबुली या बाल गुन्हेगारांनी दिली असून, या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • पिंपरी पोलिसांनी चार बाल गुन्हेगारांना देशी पिस्तुलांसह ताब्यात घेतले आहे

  • मध्य प्रदेशातून आणलेली चार पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली

  • दोन गुन्हेगारांवर पूर्वीपासून गंभीर गुन्हे दाखल होते

  • शहरात भीतीचे वातावरण असून पोलिसांचा सविस्तर तपास सुरू आहे

पुण्यातील पिंपरीमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील पोलिसांनी रेकॉर्ड वरील चार सराईत बाल गुन्हेगारांच्या ताब्यातून चार देशी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे सापळा रचून जप्त केली आहेत. या घटनेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

पिंपरी पोलीस स्टेशन हद्दीतील डेअरी फार्म जवळ चार अल्पवयीन मुलं काही अगदी शस्त्रांसह थांबून कुणाची तरी वाट पाहत आहेत अशी गोपनीय माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचला. पूर्ण प्लॅनिंगनुसार पोलिसांनी रेकॉर्ड वरील चार सराईत बाल गुन्हेगारांच्या ताब्यातून चार देशी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे सापळा रचून जप्त केली आहेत.

पोलिसांनी या गुन्हेगारांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. मध्य प्रदेशातील पप्पी सिंग यांच्याकडून आम्ही पिस्तुल आणि काडतुसे आणली आहेत अशी माहिती तपासा दरम्यान बाल गुन्हेगारांनी पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चार बाल गुन्हेगारांपैकी दोन बाल गुन्हेगारांवर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सिंहगड पोलीस स्टेशन, वारजे पोलीस स्टेशन आंबेगाव पोलीस स्टेशन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि चिखली पोलीस स्टेशन मध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.

दरम्यान या घटनेनंतर पिंपरी चिंचवड शहरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या आकड्यांनंतर बाल गुन्हेगारी चर्चेचा विषय बनला आहे. या बाल गुन्हेगारांना पोलीस कोणती शिक्षा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. शिवाय त्यांनी या पिस्तुलाचा वापर कुठे आणि का केला याचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS Transferred: दिल्ली पोलीस दलात मोठा फेरबदल; IPS अधिकाऱ्यांसह ७० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

ऐन धुळवडीत निवडणुकीचा धुरळा उडाला; आसामध्ये काँग्रेसकडून ४२ उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला कुठून संधी?

Maharashtra Live News Update: शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत?

Wednesday Horoscope : संपत्तीवरून कुटुंबातील मतभेद उघड होणार; बुधवारी ५ राशींच्या लोकांची चिंता वाढणार

मुंबईत परप्रांतीय दोन तरुणांनी काढली विदेशी महिलेची छेड; पोलिसांनी बिहारमधून मुख्य आरोपीला घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT