Ahemednagar Crime  Saam Tv
क्राईम

Ahemednagar Crime: गोळीबाराचं सत्र सुरूच; मिठाई दुकान मालकावर प्राणघातक हल्ला

Ahemednagar Crime: अहमदनगर येथेही गोळीबारची घटना घडलीय. सत्र घडत असलेल्या गोळीबारीच्या घटनामुळे राज्यात गुंडाराज सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. या हल्ल्यात धीरज जोशी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी अहमदनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(सुशिल थोरात, अहमदनगर )

Ahemednagar Firing Crime:

गेल्या काही दिवसांपासून राज्यात गोळीबारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पुण्यात पैशाच्या वादावरून गोळीबाराच्या घटनेनंतर आता अहमदनगर येथेही गोळीबारची घटना घडलीय. सत्र घडत असलेल्या गोळीबारीच्या घटनामुळे राज्यात गुंडाराज सुरू असल्याचं म्हटलं जात आहे.(Latest News)

अहमदनगर येथील गुलमोहर रोडवरील किर्लोस्कर कॉलनीत आज गोळीबारीची घटना झालीय. येथील बन्सी महाराज मिठाईवाले दुकानाचे मालक धीरज जोशी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केलाय. अज्ञात हल्लेखोरांनी गावठी कट्टा आणि तलवार यासारख्या हत्याराने त्यांच्यावर हल्ला केला . या हल्ल्याने अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडालीय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या हल्ल्यात धीरज जोशी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी अहमदनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धीरज जोशी यांच्यावर हल्ला का झाला याचे कारण अस्पष्ट असून घटनेस्थळी तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.

पैशाच्या वादातून झाडल्या गोळ्या

पुण्यात पैशाच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना घडलीय. पैशाच्या वादातून आरोपीने एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याने स्वत:वरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. पुण्यातील औंध भागात हा धक्कादायक प्रकार घडला. आरोपीने एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारानंतर आरोपीने स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली.

काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला

काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले यांच्यावर १० ते १२ जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना जानेवारी महिन्यात घडली होती. राहाता तालुक्यातील लोणी गावात ही घटना घडली होती. या हल्ल्यात चौगुले यांच्यासह शिर्डीचे माजी नगरसेवक सुरेश आरने गंभीर जखमी झाले होते. चौगुले यांच्यावरील हल्ल्याने संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT