Father Physically Abused Two Daughter SaamTV
क्राईम

Jalgaon Crime : संतापजनक! पोटच्या २ अल्पवयीन मुलींवर बापानेच केला अत्याचार

Father Physically Abused Two Daughter : पोटच्या २ अल्पवयीन मुलींवर बापानेच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलीय. ही घटना जळगावमध्ये घडलेली आहे.

Rohini Gudaghe

मुंबई : बदलापूरमध्ये ४ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचारानंतर मुंबईसह संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. या घटनेनंतर अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणखी काही घटना समोर आल्या. दरम्यान जळगाव जिल्ह्यात वडिलांनीच स्वत:च्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली. पोटच्या दोन अल्पवयीन मुलींवर नराधम बापानेच अत्याचार केल्याचं समोर आलंय.

मुलींवर बापानेच केला अत्याचार

ही घटना एरंडेल तालुक्यामध्ये घडलेली आहे. याप्रकरणी नराधम बापास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एरंडोल तालुक्यातील एका गावामध्ये हे कुटुंब राहते. या कुटुंबामध्ये ११ आणि १३ वर्षाच्या दोन मुली (Father Physically Abused Two Daughter) आहेत. १० आणि ११ रोजी या नराधम बापाने पोटच्या मुलींवर दोन वेळेस अत्याचार केल्याचं समोर आलंय. घरात कुणाला सांगितलं तर मारून टाकेन, असं धमकावत त्याने मुलींनाच आपल्या वासनेचं शिकार बनवलं आहे.

पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शाळाच काय आता घरात देखील मुली सुरक्षित असल्याचं दिसत नाहीये. कारण जळगाव जिल्ह्यात नराधम बापानेच पोटच्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार केलाय. ही घटना उघडकीस आल्यानंतर जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली (Jalgaon Crime News) होती. या तक्रारीची वरिष्ठांकडून देखील गंभीर दखल घेण्यात आली. घटनेनंतर मात्र पीडित मुली पूर्णत: हादरून गेल्या आहेत. आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे जिल्ह्यात आई वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीचा विवाह जबरदस्तीने लावून (Jalgaon News) दिला. त्यामुळे पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांसह सासरच्या मंडळींविरुद्ध देखील गुन्हा दाखल केलाय. ही घटना सिंहगड रस्ता परिसरामध्ये घडली. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यामध्ये पीडित मुलीच्या आई-वडिलांसह सासरच्या मंडळींविरुद्ध (Crime News) देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. बलात्कार तसेच बालविवाह कायद्यानुसार याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२, ३ की ४? घर बांधताना किती मजल्यांना मिळते परवानगी? जाणून घ्या काय आहेत बिल्डिंग बायलॉज नियम

Heart Failure ची सुरुवात कशी होते? छातीत दुखणं हे लक्षण नाही, डॉक्टरांनी सांगितली 7 संकेत

Maharashtra News Live Update: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक

Marathi Actor : "सण साजरे करा, पण..."; DJ बंदीवर मराठमोळा अभिनेता स्पष्टच बोलला

Political News : विरोधक एकवटले, विजय थलपती यांचे सरकार कोसळणार? राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT