Crime news India Saam TV
क्राईम

Crime news India: बाप की सैतान! पोटच्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केली हत्या, पोलिसांकडून पित्याला अटक

Kanpur murder case: कानपूरमध्ये एका पित्याने आपल्या ११ वर्षांच्या जुळ्या मुलींची निर्घृण हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून हत्येमागील कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज सकाळी हादरवून टाकणारी एक अत्यंत क्रूर आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आलीये. उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात एका पित्यानेच आपल्या दोन अल्पवयीन जुळ्या मुलींची निर्घृण हत्या केल्याने परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालंय.

कानपूरमधील नौबस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या त्रिमूर्ती अपार्टमेंटमध्ये रविवारी पहाटे ही धक्कादायक घटना घडली. आरोपीने त्याच्या ११ वर्षांच्या जुळ्या मुलींचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. या प्रकारामुळे संपूर्ण परिसर हादरून गेलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे सुमारे ४:३० वाजण्याच्या सुमारास यूपी-112 वरून फोनद्वारे दोन मुलींची हत्या झाल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत. घरात प्रवेश केल्यावर दोन्ही मुलींचे रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह पाहून उपस्थित सर्वजण स्तब्ध झाले होते.

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन फॉरेन्सिक टीमला देखील घटनास्थळी बोलावण्यात आलं. त्यांनी बारकाईने तपासणी करून आवश्यक पुरावे गोळा केले. पोलीस उपायुक्त दीपेंद्र नाथ चौधरी यांनी सांगितलं की, मृत दोन्ही मुलींच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचं स्पष्ट दिसून येतंय.

या प्रकरणात पोलीसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी पित्याला ताब्यात घेतलंय. प्राथमिक चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आलीये. मात्र या भयंकर हत्येमागील नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलीस सर्व शक्यता तपासत असून सखोल तपास सुरू आहे.

डीसीपी दीपेंद्र नाथ चौधरी यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी तत्काळ कारवाई केली. दोन्ही मुलींचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. आरोपीविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Singer Death: 'पालखी निघाली राजाची' गाण्याच्या संगीतकाराचे निधन; गणेशभक्तांमध्ये हळहळ

कॅबिनेटमध्ये होणार फेरबदल; मुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेणार, या नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी

Sunday Horoscope: आर्थिक लाभ होणार, सुर्याच्या कृपेने 5 राशींचे आयुष्य भाग्य उजळणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Sachin Tendulkar: हेल्मेट कुठे आहे? पुण्याच्या रस्त्यावर अचानक सचिन प्रकटला, नेमकं काय घडलं? VIDEO

Chanakya Niti: चांगल्या वेळेत साथ अन् वाईट काळात दुरावा, या ५ हंसाच्या स्वभावासारख्या व्यक्तींपासून राहा लांब

SCROLL FOR NEXT