Latur Crime News Saam Tv News
क्राईम

Latur Crime : बापच झाला हैवान! चॉकलेटसाठी पैसे मागितल्याचा राग, पोटच्या चिमुकलीला संपवलं; महाराष्ट्र हादरला

Latur Crime News : लातूरच्या उदगीर तालुक्यातील भीमा तांडा येथे धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या बापाने आपल्या चार वर्षाच्या मुलीला चॉकलेटसाठी पैसे मागितल्याच्या रागातून गळफास देत तिची हत्या केलीय.

Prashant Patil

लातूर : लातूरच्या उदगीर तालुक्यातील भीमा तांडा येथे धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या बापाने आपल्या चार वर्षाच्या मुलीला चॉकलेटसाठी पैसे मागितल्याच्या रागातून गळफास देत तिची हत्या केलीय. आरुषी बालाजी राठोड या चार वर्षाच्या चिमुकलीनं तिच्या वडिलांकडे चॉकलेट खाण्यासाठी पैसे मागितले. मात्र, हैवान बापानेच चार वर्षाच्या आरुषीला स्वतःच्या राहत्या घरात साडीने गळफास देत ठार केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी बालाजी राठोड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या हैवान बापाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मयत चिमुरुडीच्या आईनं केली आहे.

अशीच घटना काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये घडली होती. पोलिस शिपायाने स्वतःच्या सहा वर्षांच्या मुलीला गळफास लावून संपवलं. त्यानंतर त्याने स्वतःही गळफास लावून आत्महत्या केली. घटस्फोटानंतर मानसिक तणावानंतर त्याने हे कृत्य केल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं. स्वप्नील गायकवाड असं त्या पोलिस शिपायाचं नाव असून भैरवी असं सात वर्षांच्या मुलीचं नाव आहे.

नाशिक शहर पोलिस दलात कार्यरत असलेला पोलीस शिपाई स्वप्निल गायकवाड याचा त्याच्या पत्नीसोबत घटस्फोट झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावाखाली होता. त्यामुळेच त्याने स्वतःच्या सहा वर्षाच्या मुलीची गळफास देऊन हत्या केली. नंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली. या प्रकरणी स्वप्नील गायकवाडच्या घटस्फोटीत पत्नीकडून माहिती घेतली जाणार असल्याचं पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितलं. या घटनेमागे नेमकं काय कारण आहे याचाही तपास सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT