father in law hits daughter in law and grandson near buldhana Saam Digital
क्राईम

Buldhana Crime News : सासऱ्याचा सुनेसह 5 वर्षाच्या नातवावर कुऱ्हाडीने हल्ला, दोघे मृत्यूमुखी

हा हल्ला का केला गेला याचा तपास पाेलिस करीत आहेत.

संजय जाधव

Buldhana News :

बुलढाणा जिल्ह्यात सास-याने सूनेचा आणि नातवाचा खून केल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे. सास-याने कुटुंबातीलच दाेघांचा खून का केला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेतील आरोपी नारायण गायकी (६५ वर्ष) याला पोलिसांनी अटक केली आहे. बुलढाणा पाेलिस दल घटनेचा कसून तपास करीत आहेत. (Maharashtra News)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर शहरात घडली आहे. सास-याने सुनेचा आणि त्यांच्या पाच वर्षीय नातवाची कुऱ्हाडीने हत्या केल्याचे पाेलिसांनी सांगितले. या घटनेतील मृत व्यक्तींची नावे अश्विनी गणेश गायकी (सून) आणि समर्थ (नातू) अशी आहेत.

या घटनेची माहिती कळताच संग्रापूर पाेलिसांनी घटनास्थऴी धाव घेतली. प्राथमिक माहितीनूसार घरात कुणीही नसताना सास-याने अचानक सूनेवर आणि नातवावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. पाेलिस अधिक तपास करीत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दहावीच्या पेपर तपासणीचा मोठा घोटाळा; कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार? VIDEO

Maharashtra Live News Update: निलंगा बस डेपोत उभ्या असलेल्या बसने घेतला पेट

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावे रमाई आवास योजनेत घोटाळा; फडणवीसांच्या नावाचं बनवलं चक्क आधार आणि रेशनकार्ड

रत्नागिरीला भूकंपाचा हादरा; घाबरून लोक घराबाहेर पळाले

LPG Crisis : 'गॅस' भडका शमवण्यासाठी ओतणार 'रॉकेल'; टंचाईवर काढला तोडगा, सरकारनं घेतले २ महत्वाचे निर्णय

SCROLL FOR NEXT