Boyfriend killed by girl’s family 
क्राईम

Crime : बॉयफ्रेंडला घरी बोलवलं, हातापायाची नखे उपटली, गळा दाबून क्रूर हत्या

Boyfriend killed by girl’s family : उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये गर्लफ्रेंडने बोलवल्यानंतर २२ वर्षीय गुलशन याची बेदम मारहाण करून नखे उपटून, गळा दाबून हत्या करण्यात आली. मृतदेह शेतात फेकला. आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Namdeo Kumbhar

Girlfriend boyfriend murder : गर्लफ्रेंडने बोलवलं म्हणून २२ वर्षीय तरूण गेला, पण ८ जणांनी त्याची क्रूर हत्या केली. २२ वर्षीय बॉयफ्रेंडला बेदम मारहाण केली. त्यानंतर पक्कडीने त्याची हाता-पायाची नखे उपटली. गळा दाबून जीव घेतला अन् मृतदेह शेतात फेकला. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील फतेहपुर जिल्ह्यात घडली आहे. मृत तरुणाचे नाव गुलशन असे आहे. गुलशन याचे गावातील मुलीवर प्रेम होतं. त्या संबंधांच्या संशयावरून आठ जणांनी बेदम मारहाण करत नखे उपटली आणि गळा दाबून जीव घेतला. या प्रकरणी पोलिसांनी आठही संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत.

फतेहपुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलशन हा येथील मवई गावातील रहिवासी होता. तो पीओपीचा मजूर म्हणून काम करायचा. गुलशन याचं गावातीलच एका मुलीशी प्रेमसंबंध होते. या प्रेमाला मुलीच्या कुटुंबाचा प्रखर विरोध होता. प्रेमामुळेच गुलशनला बोलावून घेतले आणि त्याच्यावर हल्ला केला. आरोपींनी गुलशन याला प्रचंड मारहाण केली. त्यानंतर त्याची हाता-पायाची नखे पक्कडाने उपटली, अन् गळा दाबून जीव घेतला. त्यानंतर गुलशनचा मृतदेह गावाजवळील शेतात फेकून दिला.

इकडे गुलशन याला त्याचे कुटुंबिय शोधत होते. गुलशन याचा मृतदेह शेतात आढलला. गुलशन याच्या शरीरावर मारहाणीच्या आणि क्रूर छळाच्या खूना कुटुंबियांना आढळल्या. गुलशन याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. प्राथमिक तपासात हा खून असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी गावातील आठ जणांवर गुन्हा दाखल केला. काही आरोपींना बेड्या ठोकल्या असून चौकशी सुरू आहे.

गुलशन याच्या हत्याकांडामुळे फतेहपुरमध्ये खळबळ उडाली आहे. गुलशन याची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गुलशनच्या कुटुंबीयांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. गुलशन याच्या हत्यामागील सर्व पैलूंचा पोलीस कसून तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

Maharashtra News Live Update: शहापूर बसचा भीषण अपघात, 8 ते 10 प्रवासी जखमी

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

SCROLL FOR NEXT