Shocking Murder Case Viral  Saam Tv News
क्राईम

Crime News : दृश्यम चित्रपटही फेल! सुनेला संपवून घरासमोरच खड्ड्यात मृतदेह पुरला, पोलिसांनी 'असा' पर्दाफाश केला

Shocking Murder Case Viral : हुंडा आणि हत्येचं हे प्रकरण फरिदाबादच्या पल्ला परिसरातील आहे. उत्तर प्रदेशच्या शिकोहबाद येथे राहणाऱ्या तनुचं लग्न दोन वर्षांपूर्वी फरिदाबादमध्ये राहणाऱ्या अरुणसोबत झालं होतं.

Prashant Patil

फरिदाबाद : सौरभ-मुस्कान, सोनम-राजा रघुवंशी हत्या प्रकरणानंतर आता फरिदाबादमध्येही अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एका तरुणीचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. सासरच्या लोकांनी तिची हत्याच केली नाही, तर तिचा मृतदेह त्यांच्याच गल्लीत १० फूटचा खड्डा खोदून जमिनीत पुरला. तनू असं मृत तरुणीचं नाव असून ही मर्डर मिस्ट्री पाहूया.

हुंडा आणि हत्येचं हे प्रकरण फरिदाबादच्या पल्ला परिसरातील आहे. उत्तर प्रदेशच्या शिकोहबाद येथे राहणाऱ्या तनुचं लग्न दोन वर्षांपूर्वी फरिदाबादमध्ये राहणाऱ्या अरुणसोबत झालं होतं. तनुच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की, लग्नानंतरच तनुच्या सासरच्यांनी तिला मानसिक त्रास दिला. सासरच्या लोकांकडून सोन्याच्या वस्तू आणि पैशांची सतत मागणी केली जात होती.

१० फूट खड्डा खोदून मृतदेह काढला

पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने १० फूट खड्डा खोदून तनुचा मृतदेह बाहेर काढला. तनुच्या सासरच्यांनी तिची हत्या करून मृतदेह त्यांच्याच गल्लीत एका खड्ड्यात पुरला. पोलिसांनी मृतदेह फॉरेन्सिक तपास करण्यासाठी पाठवला आहे. तनूच्या सासरच्या चार लोकांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

तनुच्या कुटुंबियांनी काय म्हटलं?

तनुच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की, 'लग्नानंतरच तनुच्या सासरच्यांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. सोन्याच्या वस्तू आणि पैशांची मागणीही केली. यामुळेच लग्नाच्या एका वर्षानंतर ती तिच्या माहेरी राहिली. त्यानंतर तनुला जेव्हा जेव्हा सासरी पाठवलं, तेव्हाही ते तिला त्रास द्यायचे. त्यांनी तनुला फोनवर बोलायलाही बंदी घातली.

आरोपींनी त्यांचा गुन्हा लपवण्यासाठी असा प्लॅन रचला, जे ऐकून तनुच्या बहिणीला धक्काच बसला. तनुची बहीण प्रितीने म्हटलंय की, दोन महिन्यांपूर्वी तनुच्या सासऱ्यांनी म्हटलं की, 'तनु घरातून कुठेतरी पळून गेली आहे. तेव्हा आम्हाला त्यांच्यावर संशय आला. त्यानंतर नवीन नगर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. परंतु, पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही.

दरम्यान, पोलिसांनी त्यांना फरिदाबादला यायला सांगितलं. त्यानंतर तिथे त्यांना मृतदेह आढळला. तनुच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली की, दोन महिन्यांपूर्वी तनूच्या सासरच्या लोकांनी वेस्ट पाणी साचून ठेवण्यासाठी खड्डा खोदला आहे, असं सांगितलं. त्यानंतर तीन दिवसांनी त्यांनी म्हटलं की, त्यांची सून तनू घरातून पळून गेली आहे. त्यानंतर आम्हाला त्यांच्यावर संशय आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gyanesh Kumar: "ज्ञानेश कुमार चोर-डाकू, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा!" मतचोरीवरून विरोधक एकवटले, दिल्लीतून मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: भारताच्या लोकशाहीवर भाजपने हल्ला केलाय- राहुल गांधी

Eye Exercises : चष्म्यापासून सुटका हवी? रोज ५ मिनिटे करा 'हा' व्यायाम, डोळ्यांची नजर होईल तीक्ष्ण

Pune Politics: अर्ज सुरू, फिल्डिंग जोरात; पण ‘तो’ उमेदवार कोण? पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत मोठा ट्विस्ट

IND vs WI : सिराज आजही बाकावरच, या स्टार खेळाडूचा पत्ता कट, प्लेईंग ११ मध्ये कुणाला मिळाले स्थान?

SCROLL FOR NEXT