Fake Currency : संगमनेरमध्ये नागरिकांच्या सतर्कतेमुळे बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त; १२ लाखांच्या नोटा जप्त, आरोपीला ठोकल्या बेड्या CHATGPT
क्राईम

Fake Currency : भरधाव कार थांबवली अन पोलिसांचे डोळेच पांढरे झाले! बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटचा अहिल्यानगरमध्ये पर्दाफाश

Sangamner Fake Curency News : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये बनावट नोटांचे रॅकेट पोलिसांनी उघड केले आहे. कारमधून तब्बल १२ लाख ४० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करत एका आरोपीला अटक करण्यात आली. खऱ्या नोटांमध्ये बनावट नोटा ठेवून नागरिकांची फसवणूक करण्याचा डाव पोलिसांनी उधळून लावला.

Saam Tv

अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून बनावट नोटांचा सुळसुळाट वाढला होता. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी आरोपी मयूर किशोर सिद्धपुराला रंगेहाथ पकडले आहे. आरोपीच्या कारमधून लाख ४० हजार पर्यंतची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. तर इतर आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. नागरिकांच्या सर्तकतेमुळे पोलिसांनी बनावट रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

संगमनेर शहर पोलिसांनी बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे संशयास्पद कारचा पाठलाग करण्यात आला आणि पोलिसांनी कार अडवून एका आरोपीला ताब्यात घेतले.कारमधून तब्बल 12 लाख 40 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. खऱ्या नोटांच्यामध्ये बनावट नोटा ठेवून नागरिकांची फसवणूक करण्याचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे.

संगमनेर शहरात भरधाव वेगाने जाणाऱ्या संशयास्पद कारबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली.त्यानंतर पोलिसांनी कार अडवून मयूर किशोर सिद्धपुरा याला ताब्यात घेतले. या प्रकरणातील आणखी दोन ते तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.पोलिसांनी कारची झडती घेतली असता सुमारे 12 लाख 40 हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या या रॅकेटची फसवणुकीची पद्धतही धक्कादायक होती. प्रत्येक बंडलाच्या वर आणि खाली खरी नोट ठेवून मध्ये बनावट नोटा ठेवण्यात आल्या होत्या, जेणेकरून व्यवहारात कोणालाही संशय येऊ नये.

प्राथमिक तपासात या बनावट नोटा संगमनेरमधील एका व्यक्तीला देण्यासाठी आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून या बनावट नोटांच्या रॅकेटचे आणखी धागेदोरे उलगडण्याची शक्यता आहे.

Sunday Horoscope: पैशांची बरसात अन् घरात आनंद! रविवारचा 'या' ५ राशींसाठी घेऊन येणार मोठी खुशखबर

Shocking: बापरे! रेशनच्या तांदळात सापडली दातांची कवळी! धाराशिवमध्ये खळबळ

Pandharpur Corridor: कॉरिडॉरला स्थगिती देताच पंढरपूरसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, काय आहे सरकारचा नवा प्लॅन

अमित शहांच्या मुंबई दौऱ्याआधीच फडणवीसांनी गाठली दिल्ली; भाजपमध्ये चाललंय काय? राजकीय घडामोडींमुळे चर्चेला उधाण

शेतकऱ्यांना सरकार देतेय पेन्शन; किती मिळतात पैसे, काय आहे अर्ज प्रक्रिया?

SCROLL FOR NEXT