excise officials seized rs 30 lakh worth liquor at mumbai goa highway near patradevi saam tv
क्राईम

Sindhudurg Crime News : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर 30 लाखाची दारू जप्त, वाहन चालक फरार

Sindhudurg : ही कारवाई निरीक्षक राजेश नाईक, जयेश बांदेकर, उपनिरिक्षक वासुदेव गवस, विशाल गवस, जितेंद्र गवस, लाडू गावकर, तुकाराम जंगले यांच्या पथकाने केली.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Sindhudurg :

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर (mumbai goa national highway) सिंधुदूर्ग जिल्ह्यात बेकायदा दारू वाहतुकीवर अबकारी खात्याकडून माेठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या (sindhudurg lok sabha election 2024) पार्श्वभूमीवर विविध खात्यांकडून गोव्यातून महाराष्ट्र किंवा अन्य राज्यात जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. आज (साेमवार) पहाटेच्या सुमारास गोवा अबकारी खात्याच्या भरारी पथकाने माेठी कारवाई केली. (Maharashtra News)

गोवा अबकारी खात्याच्या भरारी पथकाने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पत्रादेवी येथील तपासणी नाक्यावर गोव्यातून आंध्रप्रदेश मध्ये होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई केली.

या कारवाईत ४२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. काळोखाचा फायदा घेत वाहन चालक फरारी होण्यात यशस्वी झाला. दरम्यान भरारी पथकाने ३० लाख रुपये किमतीची दारू आणि १२ लाख रुपये किमतीचा ट्रक जप्त केला आहे.

ही कारवाई निरीक्षक राजेश नाईक, जयेश बांदेकर, उपनिरिक्षक वासुदेव गवस, विशाल गवस, जितेंद्र गवस, लाडू गावकर, तुकाराम जंगले यांच्या पथकाने केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT