employees of karodi toll plaza fights with traders video viral Saam Digital
क्राईम

जीव मुठीत धरुन छत्रपती संभाजीनगरमधील व्यापाऱ्यांना पळावे लागले, रात्री काय घडलं कराेडी टाेल नाक्यावर (पाहा व्हिडिओ)

employees of karodi toll plaza fights with traders video viral: कराेडी टाेल नाक्यावर सहा बॅरिगेट बंद होते. केवळ एक सुरू होता. त्यामुळे ट्राफिक जाम झाले हाेते. एक बॅरिगेट उघडा अशी विनंती केल्याने कर्मचाऱ्यांनी हुज्जत घालत मारमारी सुरु केल्याचे जखमींनी सांगितले.

डॉ. माधव सावरगावे

करोडी टोलनाक्यावर शुक्रवारी रात्री छत्रपती संभाजीनगर शहरातील काही व्यापा-यांना टोलनाक्यावरील कर्मचारी आणि त्यांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहे. यामध्ये एक जण गंभीर जखमी असून चाैघांना जबर मार लागला आहे. सर्व जखमींना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

या घटनेबद्दल जखमींपैकी एकाने दिलेली माहिती अशी : छत्रपती संभाजीनगर नजीकच्या करोडी टोलनाक्यावर टोल बॅरिगेट बंद का केलेत आणि गर्दी झाल्याने एक बॅरिगेट सुरू करा अशी विनंती करायला गेला हाेताे. तेव्हा तेथील काही जणांनी जबर मारहाण केली.

आम्ही कॉन्फरन्सला नाशिकला गेलाे हाेताे. ती संपल्यानंतर परत येत असताना टोल नाक्यावर मारहाणीचा प्रकार आमच्या साेबत घडला. तिथल्या कर्मचाऱ्यांनी गज, पाईप, बेल्ट, दगडाचा वापर करून मारहाण केली. या घटनेत एकाच्या डाेक्यावर प्रहार झाल्याने त्याच्या मेंदूला मार बसल्याचे व्यापा-याने साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharli Vangi Recipe: घरच्या घरी झटपट बनवा गावरान स्टाईल चविष्ट भरली वांगी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: नीट पुनर्परीक्षा पार्श्वभूमीवर परभणीत परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात

Cancer- Acidity : ॲसिडीटीकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात, असू शकतो कॅन्सरचा धोका

Soaking mangoes: आंबा खाण्यापूर्वी पाण्यात का भिजवला जातो?

Gold Price Today: सोनं खरेदीची मोठी संधी! आठवडाभरात 3 हजारांनी घसरले दर, आजचा भाव किती?

SCROLL FOR NEXT