DRI Busted Drug Factory 
क्राईम

Narcotics Factory: नागपूरमधील ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश; ५२ किलो अमली पदार्थ जप्त, DRIची कारवाई

DRI Busted Drug Factory: डीआरआयने नागपूरमधील पाचपावली परिसरात ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश केलाय.

Bharat Jadhav

पराग ढोबळे, साम प्रतिनिधी

महसूल गुप्तचर संचालनालयने (DRI) नागपूरमध्ये मोठी कारवाई केलीय. नागपूरच्या पाचपावली परिसरातील ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश केलाय. मुंबई आणि पुणेच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केलीय. डीआरआय विभाने टाकलेल्या छाप्यात द्रव्य स्वरूपातील ५२ किलो एमडी ड्रग्ज जप्त केलंय. नागपूरमध्ये हा कारखाना सुरू असल्याची माहिती DRI ला मिळाली होती. विशेष म्हणजे नागपुरात पाचपवली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही फॅक्टरी सुरू होती.

हाती आलेल्या माहितीनुसार, महसूल गुप्तवार्ता संचालनालयने टाकलेल्या छाप्यात शंभर किलोहून अधिक नशेसाठी लागणारे मेफेड्रोन नामक हे अमली पदार्थ जप्त करण्यात आलंय. कारवाई दरम्यान DRI च्या अधिकाऱ्यांनी हे द्रव्य स्वरूपात असलेले ड्रग्ज जप्त केले, त्याची बाजाराच अंदाजे किंमत ७८ कोटी रुपये इतकी आहे. DRI च्या अधिकाऱ्यांनी या कारखान्याचा मालक, फायनान्सरसह अन्य तिघांवर कारवाई केलीय. तपास अधिकारी आरोपींच्या मदतीने त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT