Dombivli News Saam Tv
क्राईम

Shocking News : संतापजनक! खेळताना बॉल दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेला, संतापलेल्या सुरक्षारक्षकाकडून मुलांना बांधून मारहाण

Dombivli News : डोंबिवलीत सुरक्षा रक्षकाने दोन लहान मुलांना बांधून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • डोंबिवलीतील पलावा सिटीमध्ये दोन लहान मुलांना बांधून मारहाण करण्यात आली

  • सुरक्षा रक्षक राजेंद्र खंदारे याने मुलांना मारहाण केली

  • पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे

  • घटनेनंतर परिसरात संताप व सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे

संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली

डोंबिवली या शहराला 'महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी' मानले जाते. मराठी संस्कृतीचे शहर मानल्या जाणाऱ्या डोंबिवलीत धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. डोंबिवलीतील पलावामध्ये लहान मुलांचा बॉल शेजारच्या इमारतीत गेला. काही मुले तो बॉल घेण्यासाठी गेले असता त्यांना बांधून मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पलावा सिटीतल्या कासा बेला गोल्ड सोसायटीत बुधवारी संध्याकाळी काही लहान मुले हॉलीबॉल खेळत होती. खेळता खेळता या मुलांचा बॉल शेजारच्या इमारतीत गेला. बॉलच्या शोधात मुलं शेजारच्या इमारतीत बॉल आणण्यासाठी गेली. इतक्यात त्या इमारतीचा सुरक्षा रक्षक राजेंद्र खंदारे तिथे पोहचला. राजेंद्रने मुलांना पकडलं आणि तो मुलांवर ओरडला. “तुमच्यामुळे गाड्यांचं नुकसान होतंय” अशा वाक्यात त्याने मुलांना धारेवर धरलं. मात्र यावरच न थांबता राजेंद्रचा राग अनावर झाला. रागाच्या भरात त्याने चक्क दोन्ही मुलांना पकडून त्याचे हात बांधले आणि मारहाण केली. अशी माहिती मुलांच्या पालकांनी दिली आहे.

या घटनेनंतर मुलांच्या पालकांनी सुरक्षरक्षक राजेंद्रला जाब विचारला असता या संतप्त सुरक्षा रक्षकाने पालकांना ही उद्धट उत्तर दिली. शिवाय त्यांच्यावर अरेरावी करत मी काहीही केलेले नाही “मी कोणाला घाबरत नाही, जे करायचं ते करा!" असे सांगत त्यांना सोसायटी मधून बाहेर काढले. या प्रकरणा नंतर मुलांच्या पालकांनी तात्काळ सोसायटीचे अध्यक्ष आणि मानपाडा पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटना स्थळी धाव घेत राजेंद्र खंदारे याला ताब्यात घेत पुढील कारवाई सुरू केली आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झाले आहे. मात्र हाय-प्रोफाईल सोसायटीत अशा अमानुष वर्तनावरून सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: युद्धाचा फटका थेट बीडला, गॅस टंचाईविरोधात महिलांनी केलं चूल आंदोलन

Hair Care : उन्हाळ्यात डोके खाजवून हैराण झालात? 'हा' आहे कोंड्यावर रामबाण उपाय

UIDAI Internship: आधार बनवणाऱ्या कंपनीत काम करण्याची सुवर्णसंधी, UIDAI मध्ये इंटर्नशिप; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Mumbai Pune Expressway: गुड न्यूज! मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार; कधीपासून येणार सेवेत?

भाजप कार्यकर्त्याच्या घरावर बॉम्ब फोडला, आवाजाने परिसर हादरला; बचाव पथक मदतीला धावलं

SCROLL FOR NEXT