dombivli manpada police arrests seven in various theft case saam tv
क्राईम

Dombivli News : डोंबिवली मानपाडा पोलिसांची माेठी कामगिरी, रिक्षा चोरट्यांसह सात अटकेत

Dombivli Manpada Police : एसीपी सुनील कुराडे, डीसीपी सचिन गुंजाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.

Siddharth Latkar

- अभिजित देशमुख

Kalyan Dombivli :

मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, साेन साखळी चाेरीसह रिक्षा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर मानपाडा पोलिसांच्या पथकाने तपास करत सात सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्या. पाेलिसांनी संशयितांकडून सात रिक्षा, सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत केल्याची माहिती सुनील कुराडे (एसीपी डोंबिवली) यांनी दिली. (Maharashtra News)

डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा चोरी, साेन साखळी चाेरी व घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुराडे ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम चोपडे ,प्रशांत आंधळे ,संपत फडोळ ,पोलीस कर्मचारी राजेंद्र खिलारे ,सोमनाथ टिकेकर ,संजू मिसाळ ,दीपक गडगे यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू केला.

कल्याण डोंबिवली उल्हासनगर परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षा चोरणाऱ्या दोन चोरट्यांना मानपाडा पोलीसानी मोठ्या शिताफीने अटक केली. नासिर हुसेन ,शाहरुख शहा अशी या चोरट्याची नावे असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यांच्या विरोधात मानपाडा,बाजारपेठ , हिललाईन ,महात्मा फुले ,टिटवाळा, टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. चोरी केलेल्या रिक्षा ते कागदपत्र गहाळ झाल्याचा बनाव रचत मिळेल त्या किमतीत विकत होते. त्यांच्याकडून सात रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. या दोघांनी आणखी काही रिक्षा चोरी केल्याचा संशय असून मानपाडा पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी तपास करत भिवंडी येथे सापळा रचत घरफोडी करणाऱ्या आफताब मोमीन या सराईत चोरट्याला बेड्या ठोकल्यात.

आफताब विरोधात मानपाडा, नारपोली ,भोईवाडा ,निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्याच्याकडून आतापर्यंत साठ हजार रुपये किमतीचे ,सोन्याचे दागिने, मोबाईल ,रोख रक्कम मानपाडा पोलिसांनी हस्तगत केले.

काही दिवसांपूर्वी मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 64 वर्ष महिलेचे साेन साखळीची चाेरी झाली होती. मानपाडा पोलिसांनी स्वप्नील माधवानी उर्फ करकट्या बाबू याच्यासह त्याचे साथीदार कलीम हरून शेख उर्फ बंगाली बाबू ,जावेद शेख, इरफान सिद्दीकी शेख या चार सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्यात.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या चोरट्यांविरोधात टिळक नगर ,डोंबिवली, कळवा चितळसर पोलीस ठाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत .यांच्याकडून एक लाख वीस हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात मानपाडा पोलिसांना यश आलंय

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT