Dombivli Crime News Saam Digital
क्राईम

Dombivli Crime News: हाय प्रोफाइल सोसायटीत अमली पदार्थांची विक्री... दोन सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या

Dombivli Crime News: डोंबिवलीत एका हाय प्रोफाइल सोसायटीत अमली पदार्थांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी माहिती मिळताच मनपाडा पोलिसांनी सापळा रचत दोघा संशयितांनी अटक केली आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Dombivli Crime News

डोंबिवलीत एका हाय प्रोफाइल सोसायटीत अमली पदार्थांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी माहिती मिळताच मनपाडा पोलिसांनी सापळा रचत आर्षद व शादाबुद्दिन या दोघा संशयितांनी अटक केली आहे. आर्षद खान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधी देखील मुंब्रा पोलीस ठाणे व एपीएमसी नवी मुंबई पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विक्रीप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ, दोन लाख 23 हजार रोख रक्कम आणि एक बाईक जप्त करण्यात आली आहे.

डोंबिवलीतील एका प्रोफाईल सोसायटीत दोन संशयित अमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती . या माहितीच्या आधारे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुराडे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम चोपडे ,पोलीस अधिकारी सुनील तारामाळे यांच्या पथकाने पलावा सिटी परिसरात सापळा रचला होता. यावेळी दोघे संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आल्याने पोलिसांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ, दोन लाख 23 हजार रुपये रोख रक्कम आढळून आली असून पोलिसांनी दुचाकीसह मुद्देमाल जप्त केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या काही महिन्यांपासून हे दोघे एकत्र अमली पदार्थ विक्री करत होते . या दोघांनी हेअमली पदार्थ कुठे तयार केले, त्यांचे किती साथीदार आहेत याचा तपास मानपाडा पोलीस करत आहेत. दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Symbol: आमदारांनी वेगळी भूमिका घेतली तीच राजकीय फूट; शिंदे गटाचा जोरदार युक्तीवाद, वाचा सुनावणीतील महत्त्वाचे मुद्दे

Maharashtra News Live Update: आमदार राजेश पाडवी यांनी नाशिकमध्ये घेतली आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांची भेट

Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी! जुनी पेन्शन योजना परत येणार; 'या' राज्य सरकारच्या निर्णयाने खळबळ

Jio Recharge: खुशखबर! फक्त 666 रुपयांमध्ये इतक्या दिवसांची वैधता, Jio चा जबरदस्त रिचार्ज प्लान

Election Commission: २०२९च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठा बदल होणार; मतदान केंद्रांची संख्या वाढणार, RTIमधून खुलासा

SCROLL FOR NEXT