Dombivli Crime Saam TV
क्राईम

Dombivli Crime : डीजेचा आवाज कमी करायला सांगितल्याने मारहाण; डोंबिवलीती संतापजनक घटना

Crime News : दोघांनी सोनावणे यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत सोनावणे यांना दुखापत झाली असून या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली केली.

Ruchika Jadhav

अभिजित देशमुख

Dombivli Crime News :

विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यास सांगणाऱ्याला व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. डोंबिवली शेलार चौक इंदिरा नगर परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी डोंबिवली राम नगर पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सूरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यभरात 10, 12 वीसह शाळा व महाविद्यालयिन परीक्षा सुरू आहेत. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी दिवसरात्र अभ्यास करत आहेत. डोंबिवली पूर्वेतील शेलार नाका भागातील इंदिरानगरमध्ये श्याम सोनावणे राहतात. त्यांच्या शेजारी राहणारे रामदास अहिरे यांच्या घरी वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू होता.

या कार्यक्रमात डीजे लावण्यात आला होता. रात्री बारा वाजून गेल्यानंतर ही लाऊडस्पीकरवर मोठ्या आवाजातील गाणी सुरू होती. अखेर श्याम सोनावणे यांनी परिसरातील मुलांच्या परीक्षा सुरू आहेत, असं सांगत लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्याची विनंती केली. त्यामुळे अहिरे कुटुंबीयांना राग आला, त्यांनी सोनावने यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

याच दरम्यान अहिरे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमला आलेल्या दोघांनी सोनावणे यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत सोनावणे यांना दुखापत झाली असून या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली केली. या तक्रारी नुसार मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT