Dombivali Crime Saam tv
क्राईम

Dombivali Crime: संतापजनक! आठ वर्षाच्या मुलीवर अत्याचार; ट्युशन टीचरचा भाऊ बनला नराधम

Eight Year OId Girl Physical Abuse: चिमुरडी ट्युशनला गेली असताना टीचरच्या भावाने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना डोंबिवलीत घडली. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजीत देशमुख, साम प्रतिनिधी

डोंबिवलीतील एक संतापनजक घटना घडलीय. एक ८ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना डोंबिवलीमध्ये उघडकीस आलीय. याप्रकरणी पीडीतेच्या कुटुंबीयांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पुन्हा दाखल केला. आरोपी वैभव सिंग याला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. याप्रकरणी मानपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत

डोंबिवलीत पीडित मुलगी आपल्या कुटुंबीयांसह राहते. आरोपी वैभव सिंग याची बहीण ट्युशन टीचर आहे. परिसरातील मुलं त्याच्या घरी ट्युशन घेण्यासाठी येतात. बुधवारी १५ जानेवारीच्या रात्री ८ वाजता पीडित मुलगी आरोपीच्या घरी ट्युशनसाठी गेली होती. त्यावेळी घरात ट्युशन टीचर नव्हती. तेव्हा आरोपी वैभवने अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिला बेडरूममध्ये घेवून गेला आणि बेडरूममध्ये नेत तिच्यावर बलात्कार केला.

घटनेनंतर पीडित मुलगी आपल्या घरी गेली आणि घडलेल्या घटना बद्दल कुटुंबीयांना सांगितला. पीडित मुलीची कुटुंबियांनी मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी वैभव सिंग विरुद्ध गुन्हा दाखल केला, त्यानंतर पोलिसांनी ताबडतोड आरोपीला अटक करून तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

Pune: काय रे तुम्हाला मस्ती आली आहे का? लोखंडी रॉड अन् दगडाने मारहाण; पुण्यात भरचौकात टोळक्यांचा राडा, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT