Dombivali Crime News Saam tv
क्राईम

Dombivali Crime News : पती- पत्नीच्या भांडणात गमावला जीव; डोंबिवलीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांची हत्या

Dombivali News : पती- पत्नीमध्ये सुरू असलेल्या भांडणात मध्यस्थी करण्यास गेलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन व्यक्तींची हत्या झाल्याच्या धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये समोर आल्या आहे

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
डोंबिवली
: पती- पत्नीमध्ये सुरू असलेल्या भांडणात मध्यस्थी करण्यास गेलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन व्यक्तींची हत्या झाल्याच्या धक्कादायक घटना (Dombivali) डोंबिवलीमध्ये समोर आल्या आहेत. एका घटनेत संतापलेल्या पतीने शेजाऱ्याचीच हत्या केली. तर दुसऱ्या घटनेत भाऊजयीने दिराची हत्या केल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटनांमुळे डोंबिवली परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

डोंबिवली पूर्वेकडील सोनारपाडा परिसरात राहणारे संदीप मेंगाणे आणि त्याची पत्नी संगीता या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होत होते. दरम्यान ५ एप्रिलला दुपारी या दोघांमध्ये वाद झाला. यावेळी घरात संदीपचा भाऊ सागर देखील होता. (Dombivali Crime News) सागरने वाद थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापलेल्या संगीताने सागरला चाकूने भोसकले. या हल्ल्यात सागरचा मृत्यू झाला. (Crime News) याच दरम्यान संगीताने देखील स्वतःच्या हाताची नस कापून घेतली. संगीतावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मानपाडा पोलीस (Manpada Police) ठाण्यात संगीता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

दुसऱ्या घटनेत उसरघर येथील एका बांधकामाच्या साइटवर ताहियाद अली, सुफीया अली हे दोघे पती-पत्नी मजुरी करत होते. या दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ताहियाद आणि सोफिया या दोघांमध्ये वाद झाला. यावेळी त्यांच्या शेजारी राहणारा जोहर अली वाद सोडवण्यासाठी आला. यावेळी संतापलेल्या ताहियादने जोहरला लाकडी दांडक्याने मारहाण केली. हा लाकडी दांडका जोहरच्या डोक्याला लागल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर उपचार सुरू असताना उपचारादरम्यान जोहरचा मृत्यू झाला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात ताहियात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavtmal Crime : दोस्त दोस्त ना रहा! संतापलेल्या मित्रानेच जिवाभावाच्या मित्राची केली हत्या, यवतमाळ हादरले

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर दाखल

Riteish Deshmukh Video : छत्रपतींसमोर नतमस्तक! रितेश देशमुख सकाळी सकाळी पोहचला शिवनेरीवर, म्हणाला...

PM Kisan Yojana: होळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ₹२०००; पीएम किसान योजनेच्या २२व्या हप्त्याबाबत अपडेट

Election : सरपंच थेट जनतेतूनच ठरणार! सोलापूरमधील ६५५ ग्रामपंचायतीचा धुरळा उडाला, पाहा वेळापात्रक

SCROLL FOR NEXT