Soldier Extra Marital Affair  Saam Tv News
क्राईम

Shocking News : जवानाने कॉलेजमधल्या गर्लफ्रेंडसाठी बायकोला दिलं विषारी इंजेक्शन, डोळ्यासमोर तडफडली पण तो...; महाराष्ट्र हादरला

Soldier Extra Marital Affair : कपिल बाळू बागुल या जवानाचं प्रज्ञा कर्डिले या महिलेसोबत कॉलेजपासून प्रेमसंबंध होते. आता गेल्या काही दिवसांपासून प्रज्ञासोबत जवळीक वाढली होती.

Prashant Patil

धुळे : धुळे तालुक्यातील वलवाडी गावात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. भारतीय सैन्य दलात असलेल्या कपिल बागुल याने पत्नी शारदा कपिल बागुल हिची निर्घृण हत्या केली. प्रेमसंबंधाला अडसर ठरलेल्या पत्नीला विषारी इंजेक्शन देऊन खून करणाऱ्या सैन्य दलातील लिपिकासह प्रेयसी, सासू, सासरे आणि नणंद अशा पाच जणांना पश्चिम देवपूर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कपिल बाळू बागुल या जवानाचं प्रज्ञा कर्डिले या महिलेसोबत कॉलेजपासून प्रेमसंबंध होते. आता गेल्या काही दिवसांपासून प्रज्ञासोबत जवळीक वाढली होती. जवान कपिल बागुल याची पत्नी शारदा यांच्यात यावरून वाद झाला. त्यानंतर शारदाला संपवण्यासाठी त्याने बळजबरीनं पेस्टीसाईडचं इंजेक्शन दिलं. त्यावेळी शारदा तडफडू लागली आणि तिच्या तोंडातून फेस आला मात्र तो तिथे बसून फक्त तमाशा पाहत राहिला.

तिचा छळ करण्यात येत होता. शारीरिक छळ करून मारले, फोन आला तर ती आजारी आहे त्यानंतर अर्ध्या तासात तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. असा कोणता आजार झाला होता, असं नातेवाईकांनी म्हटलं आहे. आपल्या पत्नीला मारणाऱ्या जवानाने त्याने नंतर तिला रूग्णालयात नेण्याचं नाटक केलं आणि घाई करत तिचे अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुटुंबियांनी तक्रार केल्यावर सर्व प्रकार उघडकीस आला.

मयत महिलेचा भाऊ भूषण महाजन याने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी पती कपिल बाळू बागुल, सासरे बाळू बुधा बागुल, सासू विजया बाळू बागुल (तिघेही रा. वलवाडी), नणंद रंजना धनेश माळी (रा. छत्रपती संभाजीनगर) आणि प्रेयसी प्रज्ञा कर्डीले (रा. धुळे) या पाचही जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर रात्री या पाचही जणांना पोलिसांनी अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Cancer Symptoms: भूक कमी अन् सतत थकवा जाणवतोय? तुम्हाला लिव्हर कॅन्सर तर नाही ना? वाचा लक्षणे

Maharashtra Live News Update: वडापावमध्ये आढळले प्लास्टिकचे तुकडे

Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाज्यांना कोणता रंग द्यावा?

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

SCROLL FOR NEXT