dhule police arrests two in mobile theft case Saam Tv
क्राईम

Dhule Crime News : माेबाईल चाेरट्यांचा देवपूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Dhule Latest Crime News : तक्रारदाराने पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिस पथकातील अधिकाऱ्यांना या संदर्भातील माहिती दिली. पाेलिसांनी तात्काळ हालचाली करुन तपास करीत दाेघांना अटक केली.

भूषण अहिरे

Dhule :

धुळे शहरातील मोबाईल हिसकावून पोबारा करणाऱ्या दोघांना देवपूर पोलिसांनी अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली. अटकेतील दाेघांवर यापूर्वी गुन्हे दाखल असल्याची माहिती समाेर आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

देवपूर पोलिस ठाणे हद्दीमध्ये रात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान दोघा सराईतांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोबाईल हिसकून पोबारा केला हाेता. या संदर्भात संबंधित तक्रारदाराने पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिस पथकातील अधिकाऱ्यांना या संदर्भातील माहिती दिली. पाेलिसांनी तात्काळ हालचाली करुन तपास करीत दाेघांना अटक केली.

त्यांच्याकडून त्यांनी चोरलेला मोबाईल व यादरम्यान त्यांच्याकडे असलेली दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली. या दोघांविरोधात विविध कलमान्वये यापूर्वी देखील गुन्हा दाखल असल्याचे उघडकीस आले आहे. देवपूर पोलिस ठाण्यात दोघा सराईतांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती देवपूर पोलिस निरीक्षकांतर्फे देण्यात आली आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंचा पाटलांना मोठा धक्का! TDCC निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय, मोठा उलटफेर

सौदी अरबमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश; भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू

Pune Rainfall: पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपलं, ढगफुटीसदृश्य परिस्थिती; जनजीवन विस्कळीत, पाहा VIDEO

Moong Dal Chilla Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळ चिल्ला, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कार आणि चाकू SIT कडून जप्त

SCROLL FOR NEXT