dhule police arrests three along with 36 lakhs liquor saam tv
क्राईम

Dhule Crime News : मद्य वाहतुक प्रकरणी धुळे एलसीबीकडून तिघांना अटक, 36 लाख 89 हजारांचा मुद्देमाल जप्त

Dhule Local Crime Branch : एका मालवाहू वाहनातून शिरपूरच्या दिशेने अवैध दारुची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती एलसीबीचे पीआय दत्तात्रय शिंदे यांना मिळाली होती.

भूषण अहिरे

Dhule :

नगाव शिवारात वाहनातून होणारी अवैध दारुची वाहतूक रोखत धुळे एलसीबीने (dhule local crime branch) मद्य तस्करांना दणका दिला आहे. विशेष म्हणजे तस्करांनी चक्क सिनेमा स्टाईलने ही दारूची अवैध वाहतूक केली असल्याचे आढळून आले. या कारवाईत एलसीबीने दारुसाठ्यासह दाेन वाहन असा एकूण 36 लाख 89 हजारांचा मुद्देमाल जप्त करत तिघांना ताब्यात घेतले आहे. (Maharashtra News)

एका मालवाहू वाहनातून शिरपूरच्या दिशेने अवैध दारुची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती एलसीबीचे पीआय दत्तात्रय शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी संबंधित वाहनाचा शोध घेवून त्यावर कारवाई करण्यासाठी पथकाला रवाना केले.

या पथकाने धुळे शहराबाहेर नगाव शिवारात धुळ्याकडून सोनगीरच्या दिशेने एक कार व तिच्या मागे एक मालवाहू वाहन जाताना दिसले. या दोन्ही वाहनांचा संशय आल्याने पथकाने वाहनांना अडविले. ही दोन्ही वाहने तपासणी करण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात नेण्यात आली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वाहनांच्या तपासणीत वाहनाच्या मध्यभागी सिमेंटचे पत्रे कापून त्यात दारुचे बॉक्स ठेवलेले होते. या दारुची वाहतूक विनाव्यत्यय व्हावी यासाठी मालवाहू वाहनाच्या पुढे एक कारही ठेवण्यात आली होती.

या कारवाईत एलसीबीने दारुसाठ्यासह दाेन्ही वाहनं मिळून एकूण 36 लाख 89 हजारांचा मुद्देमाल जप्त करत पाेलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या (lok sabha election 2024) पार्श्वभूमिवर पाेलिस सतर्क झाले आहेत. 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT