Dhule Cyber Police exposing a fake Instagram account used to circulate morphed obscene images. Saam Tv
क्राईम

बनावट इंस्टाग्राम अकाऊंटचा पर्दाफाश; मैत्रिणींचेच अश्लील फोटो केले व्हायरल, महिला वकिलाचा धक्कादायक कारनामा

Fake Instagram Account Case In Dhule: धुळ्यात बनावट इंस्टाग्राम अकाउंटद्वारे महिलांचे फोटो मॉर्फ करून अश्लील स्वरूपात व्हायरल करणाऱ्या महिला वकिलाचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला.

Omkar Sonawane

धुळ्यात सोशल मीडियाचा गैरवापर करून महिलांचे फोटो मॉर्फ करून ते अश्लील स्वरूपात प्रसारित करणाऱ्या टोळीचा धुळे सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात एका महिला वकिलानेच तिच्या ओळखीच्या आणि मैत्रिणींच्या फोटोंचा गैरवापर केल्याचे तपासात उघड झाले असून, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

सायबर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेचे कलम 75, 79 तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपासात आरोपी महिला वकील आणि तिचा साथीदार मेघराज कंडमबांडे यांनी संगनमत करून ‘एरोबिक व्हॉट्सॲप ग्रुप’मधील सदस्यांचे फोटो चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. हे फोटो मॉर्फ करून त्यांचे अश्लील फोटो तयार करण्यात आले आणि बनावट इन्स्टाग्राम आयडीच्या माध्यमातून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले.

या कृत्यामुळे संबंधित महिलांची समाजात बदनामी झाली असून, मानसिक त्रासालाही त्यांना सामोरे जावे लागले. सायबर पोलिसांनी अत्यंत बारकाईने डिजिटल पुरावे गोळा करत दोन्ही आरोपींची ओळख पटवून त्यांना निष्पन्न केले आहे. विशेष स्वरूपाच्या या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावल्याने सायबर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत असून, या कारवाईमुळे सोशल मीडियावर गुन्हे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सध्या दोन्ही आरोपींविरोधात पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT