Dhule Breaking News Dhule Breaking News
क्राईम

Dhule Crime : आई, वडील अन् दोन सोन्यासारखी लेकरं, चौघांनी आयुष्य संपवलं; धुळे हादरलं!

Dhule Breaking News: आई वडील, आणि दोन मुलांनी आत्महत्या केल्या असून या भयंकर घटनेने जिल्हा हादरुन गेला आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरु आहे.

Gangappa Pujari

भूषण अहिरे, धुळे|ता. १९ सप्टेंबर

Dhule Crime Four Death In Same Family: धुळे शहरामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धुळे शहरातील समर्थ कॉलनी परिसरात एकाच कुटुंबांतील चौघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. आई वडील, आणि दोन मुलांनी आत्महत्या केल्या असून या भयंकर घटनेने जिल्हा हादरुन गेला आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरु आहे.

आई वडील आणि दोन मुले..

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एकाच घरातील चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धुळ्यामध्ये घडली आहे. आई वडील आणि दोन मुलांचा मृतांमध्ये समावेश असून धुळे शहरातील समर्थ कॉलनीमध्ये घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत तपास सुरु केला आहे.

एकाच घरातील चौघांची आत्महत्या

प्रवीण मानसिंग गिरासे, गीता प्रवीण गिरासे व मुलं मितेश प्रवीण गिरासे, सोहम प्रवीण गिरासे असे आत्महत्या करणाऱ्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. यापैकी प्रविण गिरासे यांनी गळफास घेऊन तर कुटुंबातील इतर तिघे जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

पोलीस तपास सुरु...

दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. आई वडिलांनी दोन सोन्यासारख्या लेकरांसोबत आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या सामुहिक आत्महत्येमागचे कारण अद्याप समोर आले नसून संपूर्ण कुटुंबाने इतक्या टोकाचा निर्णय का घेतला असावा? असा सवाल आता उपस्थित होत आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चणे की शेंगदाणे? आरोग्यासाठी सर्वात जास्त फायदेशीर काय?

Brownies Recipe : अंड्याशिवाय बनवा मऊ, टेस्टी चॉकलेटी ब्राउनी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: केडीएमसी क्षेत्रातील अनधिकृत होर्डिंग्जधारकांवर आता मोठी कारवाई होणार

अंगावर काटा आणणारा अपघात! २५१ kmph वेगातील BMW चा चुराडा; हायवेवर मृतदेहांचे अवयव विखुरले

धक्कादायक! व्यायाम करताना पोलीस कर्मचाऱ्याला जिममध्ये हार्ट अटॅक; जागेवरच दुर्दैवी मृत्यू, थरारक व्हिडीओ समोर

SCROLL FOR NEXT