Santosh Deshmukh Case CCTV Saam Tv
क्राईम

Santosh Deshmukh Case: सीसीटीव्हीत मीच आहे, व्हायरल व्हिडिओनंतर धनंजय देशमुख यांचं स्पष्टीकरण

Santosh Deshmukh Case CCTV: संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात आरोपी आणि संतोष देशमुख यांचा भाऊसोबत पोलीस निरीक्षक असल्याचं आहे.

Bharat Jadhav

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक राजेश पाटील, आरोपी सुदर्शन घुले आणि धनंजय देशमुख दिसत आहेत. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ एका हॉटेलमधला असून, यात या तिघांची भेट झाल्याची स्पष्ट दिसत आहे.

केज शहरातील एका हॉटेलमध्ये आरोपी सुदर्शन घुले, पोलीस निरीक्षक राजेश पाटील यांची भेट होते व काही वेळातच धनंजय देशमुख हे त्या ठिकाणी येतात, चहा घेतात. या व्हिडिओबाबत धनंजय देशमुख यांना विचारले असता, आमची फक्त भेट झाली. इतर विषयांवर चर्चा झाली, असल्याचं त्यांनी सांगितलं.

बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्राभर उमटले. अशातच या संदर्भातला एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये आरोपी सुदर्शन घुले, पोलीस निरीक्षक राजेश पाटील यांची भेट होते व काही वेळातच धनंजय देशमुख देखील येतात, चहा घेतात. त्यानंतर त्या चहाचे बील आरोपी सुदर्शन घुले देत असताना, त्याला थांबवून धनंजय देशमुख हे स्वतः त्या हॉटेलचे बील देतात.

या व्हिडिओबाबत स्पष्टीकरण देताना, धनंजय देशमुख म्हणतात, 'मी त्या हॉटेलमध्ये मित्रासोबत चहा प्यायला गेलो होतो. त्यावेळी राजेश पाटील व आरोपी सुदर्शन घुले हे त्या ठिकाणी आले. यातील राजेश पाटील यांनी मला बोलावून घेतले. त्यानंतर यापूर्वी झालेल्या मारामारी बाबत माहिती घेतली, एवढेच आमचे बोलणे झाले. असे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे. दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, पोलीस या व्हिडिओच्या संदर्भात तपास करत आहेत.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा

बीडमधील संतोष देशमुख यांच्या घरी जाऊन आमदार रोहित पवार यांनी भेट घेतली. 'संतोष देशमुख मृत्यू प्रकरणामध्ये न्यायालयीन चौकशी करा, बीडचे पालकमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावं, राज्यात अनेक SIT स्थापन झाल्यात. कुठलाही कलंक नसलेला अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये आणा, तरच देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळेल. असं आमदार रोहित पवार यांनी संतोष देशमुख प्रकरणाविषयी भाष्य केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, सिनेसृष्टी शोक सागरात बुडाली

Diabetes Symptoms: अचानक हे ५ बदल दिसले तर समजा शरीरात साखरेचं प्रमाण वाढलंय, वेळीच लक्षणं ओळखा

Maharashtra News Live Update: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे पुण्यापर्यंत?

Baramati plane crash : बारामतीत पुन्हा एक विमान अपघात

Pune : लॉजच्या बंद रूममध्ये मुली नको त्या अवस्थेत, पोलिसांनी छापा टाकताच उघडं पडलं रॅकेट; पुण्यातील घटना

SCROLL FOR NEXT