Delhi Crime saam Tv
क्राईम

Delhi Crime News: मामाच्या मुलाची तरुणीकडून जाळून हत्या; सततच्या त्रासाला कंटाळून तरुणीचं टोकाचं पाऊल

Crime News: दिल्लीतील वजिराबाद परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीने आपल्याच मामाच्या मुलाची जाळून हत्या केली आहे. तरुणी मामाच्या मुलीच्या एकतर्फी प्रेमात होता आणि तो तिला त्रास द्यायचा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Delhi Girl Burnt His Cousin Brother:

दिल्लीतील वजिराबाद परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीने आपल्याच मामाच्या मुलाची जाळून हत्या केली आहे. तरुणी मामाच्या मुलीच्या एकतर्फी प्रेमात होता आणि तो तिला त्रास द्यायचा. या त्रासाला कंटाळून तरुणीने टोकाचं पाऊल उचललं आणि तरुणाला कायमचं संपवलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचे नाव अब्दुल्ला आहे. तो कुटुंबासोबत संगम विहार भागात राहत होता. डिलिव्हरी बॉय म्हणून तो काम करत होता. तर सानिया असे आरोपी तरुणीचे नाव आहे. अब्दुल्ला मामाची मुलगी सानियाच्या एकतर्फी प्रेमात होता. सानियाने आपल्यासोबत लग्न करावं अशी त्याची इच्छा होता. यातूनच तो तिला त्रास द्यायचा. त्याच रागातून तिने अब्दुल्लाची हत्या केली आहे. (Latest News)

सानियाने गुरुवारी अब्दुल्लाला घरी बोलावून घेते. अब्दुल्ला घरी आल्यावर त्याच्यासाठी चहा आणण्यासाठी म्हणून सानिया किचनमध्ये गेली. त्यानंतर काही वेळाने सानिया बाटलीत पेट्रोल घेऊन आली आणि अब्दुलावर ओतले आणि त्याला पेटवून दिले.

आग लागल्यावर अब्दुल्ला घरातून बाहेर पडला आणि रस्त्यावर धावत सुटला. त्याने त्याच्या अंगावरचे कपडे काढून फेकून दिले. मात्र, तोपर्यंत पूर्णपणे भाजला होता. स्थानिक लोक अब्दुल्लाच्या मदतीला धावले आणि आग विझवली. घटनेची माहिती काहींनी पोलिसांना दिला. या घटनेत अब्दुल्ला गंभीररित्या भाजला होता. त्याला एलएनजेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी रुग्णालयातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

एकतर्फी प्रेमातून अब्दुल्ला सानियाला त्रास देत होता. यालाच कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अब्दुल्लाचा मृत्य होण्यापूर्वी त्याने पोलिसांना सांगितले की, सानियाने त्याच्यावर पेट्रोल टाकून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सानियाचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. त्यावेळी अब्दुल्लाने स्वतः नस कापून घेतली होती. काही दिवसांनी सानियाचे लग्न होणार होते. पोलिस याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी अजून कोणालाही अटक केलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली?

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! दोन्ही राष्ट्रवादीची अचानक बैठक, कोअर कमिटीनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण काय?

Cabinet Reshuffle : राज्यातील ५ मंत्री बदलणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांच्या हालचाली, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT