Delhi Crime saam Tv
क्राईम

Delhi Crime : मोमोज खाताना खांद्याला हात लागला म्हणून मुलाला संपवलं, CCTV मुळं नेमकी घटना झाली उघड

Delhi Crime News : दिल्लीतील द्वारका येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. डाबरी परिसरात एका किरकोळ कारणातून १७ वर्षीय मुलाची हत्या झाली आहे. मोमोज खाताना या मुलाचा दुसऱ्या एका मुलाच्या खांद्याला स्पर्श झाला. त्यामुळे रागाच्या भरात अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Delhi Crime News :

दिल्लीतील द्वारका येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. डाबरी परिसरात एका किरकोळ कारणातून १७ वर्षीय मुलाची हत्या झाली आहे. मोमोज खाताना या मुलाचा दुसऱ्या एका मुलाच्या खांद्याला स्पर्श झाला. त्यामुळे रागाच्या भरात अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली. चाकू भोकसून अल्पवयीन मुलाची हत्या केली. पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ डिसेंबर रोजी माहिती मिळाली की रोहतश नगर भागात मोमोज खाताना एका व्यक्तीच्या खांद्याला हात लागल्याने एका अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली. या घटनेचा तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

तपास सुरू असताना पीडित मुलाच्या मित्रांनी या घटनेबाबत माहिती दिली. आरोपीदेखील अल्पवयीन असल्याचे समोर आले. आरोपीला लवकरच ताब्यात घेण्यात येईल. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) तपासण्यात आले. यात एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर चाकून वार केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tap Cleaning Tips: स्टीलच्या नळांवरील डाग काढण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; वापरा 'या' घरगुती टिप्स

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपके पुन्हा दिल्लीमधील आंदोलनात सहभागी होणार

Political News : दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी, महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

OTT Releases : 'या' आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल? नव्या चित्रपटांसह वेब सीरिज अन् रिॲलिटी शोची मेजवानी!

SCROLL FOR NEXT