Delhi News Saam TV
क्राईम

Delhi News: खांद्याला धक्का लागला म्हणून तरुणाला थेट चाकूने भोसकलं; धक्कादायक घटनेनं दिल्ली हादरली

Crime News: गुरप्रीत असं मृत तरुणाचं नाव आहे. तो समयपूर येथे आपल्या कुटुंबासह राहत होता. आई, बाबा, मोठा भाऊ आणि दोन बहिणी असं सुंदर कुटुंब कायम हसत खेळत आयुष्य जगत होतं.

Ruchika Jadhav

Delhi Crime News:

दिल्लीमधून मन सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. एका २५ वर्षीय तरुणाची क्रूरतेने हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी तरुणावर कुत्रा सोडला होता. नंतर शॉलने त्याचा गळा आवळून चाकूने हल्ला केला. यात तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. क्रूरतेनं तरुणाची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गुरप्रीत असं मृत तरुणाचं नाव आहे. तो समयपूर येथे आपल्या कुटुंबासह राहत होता. आई, बाबा, मोठा भाऊ आणि दोन बहिणी असं सुंदर कुटुंब कायम हसत खेळत आयुष्य जगत होतं. मात्र मुलाच्या निधनामुळे आता त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

नेमकं काय घडलं?

रविवारी गुरप्रीत आणि त्याच्या दोन लहान बहिणी बाहेर फिरण्यासाठी गेल्या होत्या. बाजारात गेल्यावर तिथे एका तरुणाचा त्याला धक्का लागला. खांद्याला धक्का लागल्याने गुरप्रीत आणि त्या तरुणामध्ये वाद सुरू झाला. वाद इतका टोकाला गेला की, दोघांमध्येही शिविगाळ सुरू झाली आणि नंतर दोघेही एकमेकांना मारहाण करू लागले.

हे सर्व पाहून गुरप्रीतच्या बहिणी घाबरल्या. त्यांनी ही भांडणे कशीबशी थांबवली आणि त्याला घरी नेलं. घरी गेल्यावर दुसऱ्या दिवशी बाजारात हाणामारी करणारा तरुण आपल्या मित्रांसह गुरप्रीतच्या घरी आला. बदला घेण्यासाठी त्याने घरातून गुरप्रीतला बाहेर कढलं. सुरुवातीला या तरुणांच्या टोळक्याने गुरप्रीतवर कुत्रा सोडला. त्यानंतर शॉलने त्याचा गळा आवळला. तसेच चाकूने त्यावर वार करत त्याची हत्या केली.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थाळी धाव घेताली. गुरप्रीतचे शव ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT