Delhi Crime  Saam tv
क्राईम

Crime: बायकोचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, डोक्यात सिलिंडर घालत नवऱ्याने जागीच संपवलं

Delhi Crime: दिल्लीमध्ये एका व्यक्तीने डोक्यात सिलिंडर घालून बायकोची निर्घृण हत्या केली. बायकोचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्याने हे भयंकर कृत्य केले. या घटनेमुळे दिल्ली हादरली आहे.

Priya More

Summary -

  • दिल्लीत नवऱ्याने बायकोची हत्या केली

  • बायकोवर सिलिंडरने हल्ला करण्यात आला

  • अनैतिक संबंधाच्या संशयातून ही घटना घडली

  • पोलिसांनी आरोपीला अटक केली

दिल्लीमध्ये नवऱ्याने बायकोची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. अनैतिक संबंधाच्या संशयावरून नवऱ्याने बायकोच्या डोक्यावर गॅस सिलिंडरने हल्ला करत तिला जागीच संपवलं. ही घटना दिल्लीच्या पुल प्रहलादपुर भागात घडली. रविवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून त्यामुळे दिल्ली हादरली. पीडित महिलेला दीड वर्षांची मुलगी आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, नवरा-बायकोमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. रविवारी रात्री दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वाद ऐवढा वाढला की रागाच्या भरात नवऱ्याने बायकोवर सिलिंडरच्या सहाय्याने हल्ला केला. या हल्ल्यात महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तिच्या पाठीचा कणा तुटला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा जास्त रक्तस्राव झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला. आपल्या चिमुकल्या दीड वर्षांच्या मुलीचा देखील या व्यक्तीने विचार केला नाही. आईचा मृत्यू झाल्यामुळे चिमुकलीच्या डोक्यावरील आईचे छत्र हरपलं. तर बाप आता तुरूंगात गेला.

महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारच्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा आतून बंद होता. घरमालकाच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला. आतमधील दृश्य खूपच भयानक होती. महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तर तिच्याजवळ रक्ताने माखलेला सिलिंडर होता. आरोपी त्याच्या दीड महिन्यांच्या मुलीला मांडीवर घेऊन बायकोच्या मृतदेहाजवळ बसला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली. तर त्याची दीड वर्षांची मुलगी आता शेजारच्यांकडे आहे. पोलिस महिलेच्या नातेवाईकांना संपर्क करत आहेत जेणेकरून ती मुलगी त्यांच्या ताब्यात देता येईल. या घटनेमुळे दिल्लीमध्ये खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : उत्साहात दिवस जाईल, ५ राशींच्या व्यक्तींना धनलाभ होणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

Rain Alert : पुढील ८ ते ४८ तासांत कोकण-गोव्यासह १९ राज्यांत वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अलर्ट

Mens Health : पुरुषांच्या लघवीतून रक्त येणे हे गंभीर आजाराचे लक्षण आहे? वेळीच व्हा सावध अन्यथा...

Maharashtra News Live Update: नीट पेपरप्रकरणी पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा

जयश्री नागे आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; नवऱ्याला ७ वर्षांचा तुरुंगवास, सासरच्या मंडळीची निर्दोष मुक्तता, कोर्टात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT