Wardha Crime Saam Tv
क्राईम

Wardha Crime: विद्यार्थिनीच्या वसतिगृहातील शौचालयात आढळले मृत अर्भक

Wardha Crime: वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहातील शौचालयात मृत अर्भक आढळले. सावंगी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Bharat Jadhav

(चेतन व्यास)

Dead Infant Found Hostel Toilet :

वर्ध्यातील सावंगी मेघे परिसरात असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहाच्या शौचालयात अर्भक मृतावस्थेत आढळून आले आहे. याप्रकरणी वसतिगृहातील महिला कर्मचाऱ्याने पोलिसांत तक्रार दिलीय. सावंगी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.(Latest News)

वैद्यकीय महाविद्यालय परिसराला लागून असलेल्या सरस्वती वसतिगृह आहे. या वस्तीगृहाच्या ग्राउंड फ्लोरवर असलेल्या शौचालयाच्या खड्ड्यात अज्ञाताने मृत अर्भक फेकलं होतं. याची माहिती वसतिगृहात काम करणाऱ्या महिलेला मिळताच त्यांनी पाहणी केली. याबाबतची तक्रार त्यांनी तत्काळ सावंगी पोलिसांत दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी तत्काळ वसतिगृह गाठून तपासणी केली असता अर्भक मृतावस्थेत असल्याचे समजले. अज्ञातांनी मृतदेहाची गुप्तपणे विल्हेवाट लावून अपत्य जन्माची लपवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलीय. तसेच पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT