Mumbai Crime News Saam Tv
क्राईम

Mumbai Crime : गजबजलेल्या मुंबईत दिवसाढवळ्या दरोडा, तिघे ज्वेलर्सच्या दुकानात घुसले, दागिने लुटून पळ काढताना हवेत गोळीबार

Mumbai Crime News : मुंबईत ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा टाकण्यात आला आहे. शिवाय दरोडेखोरांनी हवेत गोळ्या झाडून पळ काढला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • घाटकोपरमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यात आला

  • दरोडेखोरांनी लुटमारीदरम्यान हवेत दोन गोळ्या झाडल्या

  • दरोडेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला

  • पोलिसांकडून तपास सुरू आहे

मुंबई शहरातील घाटकोपर येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दरोडेखोरांनी भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा टाकण्यात आला आहे. शिवाय काही गुंडानी हवेत गोळीबार देखील केला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत.

मिळलेल्या माहितीनुसार, घाटकोपर च्या अमृतनगर सर्कल येथे भरदिवसा दर्शन ज्वेलर्स वर दरोडा टाकण्यात आला. ही घटना आज सकाळी सुमारे साडे दहा वाजताच्या दरम्यान घडली. दर्शन ज्वेलर्समध्ये जवळपास १० च्या सुमारास दरोडेखोर घुसले. त्यांनी दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. काही दागिने लुटून स्वतःकडे ठेवून घेतले. मात्र इतक्यात दरोडेखोरांना ज्वेलर्समालक दर्शन मिटकरी यांनी विरोध केला.

मिटकरी यांनी विरोध केला असता दरोडेखोर त्यांच्यावर अंगावर धावून गेले आणि वार करून पळू गेले. यांच्यातील दोन जण दुचाकी वर पळून गेले तर एक जण हातात बंदूक घेऊन पळत निघाला. त्याला पकडण्यासाठी आजूबाजूचे नागरिक त्याच्या मागे पळत गेले. मात्र त्याने नागरिकांना भीती दाखविण्यासाठी त्याच्याकडील बंदुकीतून दोन गोळ्या हवेत झाडल्या.

गोळ्या झाडून हा दरोडेखोर इंदिरा नगर च्या डोंगरावर पळून गेला. या घटनेची माहिती पोलिसांत कळवण्यात आली आहे. या दरोडेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला असून घटनास्थळी फॉरेन्सिक टीम, गुन्हे शाखा, वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत. दरम्यान या घटनेने मुंबईत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT