Bihar Crime News  Saam Tv
क्राईम

Crime News: बहिणीच्या दीरावर जीव जडला, ३ मुलांच्या आईने नवऱ्याच्या हत्येचा कट रचला; जीवघेणा हल्ला केला पण...

Bihar Police: बिहारमध्ये ३ मुलांची आई बहिणीच्या दिराच्या प्रेमात पडली. या महिलेने प्रियकरालाच आपल्या नवऱ्याची हत्या करण्यास सांगितले. पण तिने रचलेला कट अयशस्वी ठरला. या हल्ल्यात तिचा नवरा थोडक्यात बचावला.

Priya More

बायकोकडून नवऱ्याच्या हत्येच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. या घटना ऐवढ्या भयंकर होत्या की त्यामुळे संपूर्ण देशभर चर्चा होत आहे. विवाहबाह्य संबंधातून या हत्या झाल्याचे उघड झाले आहे. आता बिहारमध्ये अशाचप्रकारची घटना घडली आहे. बहिणीच्या दिराच्या प्रेमात एक महिला इतकी वेडी झाली की तिने नवऱ्याच्या हत्येचा कट रचला. या महिलेने प्रियकराच्या मदतीने नवऱ्यावर जीवघेणा हल्ला केला पण सुदैवाने या हल्ल्यात नवरा बचावला. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

बिहारमध्ये ३ मुलांच्या आईचा जीव आपल्या बहिणीच्या दिरावर जडला. दोघे इतके प्रेमात पडले की या महिलेने प्रेमात अडसर ठरणाऱ्या आपल्या नवऱ्याची हत्या करण्याचा कट रचला. या महिलेने प्रियकरालाच नवऱ्याची हत्या करण्यास सांगितले. त्याने त्याच्यावर हल्ला केला पण त्याचा प्रयत्न यशस्वी ठरला नाही. या हल्ल्यात तो जखमी झाला. याप्रकरणी बिहार पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किऊथ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जलप्पा येथे ही घटना घडली. २२ मार्च रोजी पंकज यादव या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात पंकज गंभीर जखमी झाला. पंकजवर हल्ला कोणी केला याचा तपास करत असताना पोलिसांना त्याच्या पत्नीनेच हल्ल्याचे षडयंत्र रचल्याचे समजले. बिंदू देवीने आपला नवरा पंकज यादवची हत्या करण्यासाठी प्रियकराची मदत घेतली. पोलिसांनी बिंदू यादव आणि तिचा प्रियकर उदय यादव यांना अटक केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पंकजवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पंकजची पत्नी बिंदूचे रामगढ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या चमघरा येथे राहणाऱ्या उदय यादवशी प्रेमसंबंध होते. उदय हा बिंदूच्या बहिणीचा दीर आहे. पंकजला आपल्या पत्नीच्या विवाहबाह्यसंबंधाबद्दल माहिती पडले. त्याने या नात्याला विरोध केला. यामुळेच संतप्त झालेल्या बिंदूने आपला प्रियकर उदयसोबत मिळून मास्टरप्लान तयार केला. 'तू फक्त माझ्या नवऱ्याला मारून टाक.', असं तिने उदयला सांगितले. तिने सांगितल्याप्रमाणे उदयने पंकजवर जीवघेणा हल्ला केला पण तो बचावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT