Crime In Car Saam Tv
क्राईम

Crime News : शिक्षकच बनला भक्षक; बंद कारमध्ये विकृत चाळे, दहावीतल्या दोन विद्यार्थिनींचा विनयभंग

Washim Crime News : वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका शिक्षकाने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींचा कारमध्ये विनयभंग केला आहे. या घटनेनंतर आरोपी शिक्षक फरार झाला आहे.

Yash Shirke

मनोज जैस्वाल, साम टीव्ही, प्रतिनिधी

Washim News : वाशिममधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील एका शाळेत एका शिक्षकाने दोन विद्यार्थीनींचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शिक्षकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी शिक्षक फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्री फॉरेस्ट येथील शाळेतून दोन्ही मुली दहावी बोर्डाचा पेपर लिहून घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. रस्त्यावर थांबलेल्या या दोन्ही मुलींना शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षक गजानन याच्या कारमधून घरी जाण्यास सांगितले. मुख्याध्यापकांचे ऐकून मुली कारमध्ये बसायला तयार झाल्या.

कार कामटवाडा गावापर्यंत गेल्यानंतर शिक्षकाने दोन्ही विद्यार्थींनीशी अश्लील चाळे करत त्यांचा विनयभंग केला. गाडीत इतर दोन शिक्षकही बसलेले होते. गजानन याच्या कृतीला त्यांनी विरोध केला. ते शिक्षक कारमधून खाली उतरले आणि त्यांनी दोन्ही मुलींनाही कारमधून बाहेर उतरवले. त्यानंतर ऑटो करुन मुलींना त्यांनी घरी सोडले.

घरी पोहोचल्यावर दोन्ही मुलींनी आपापल्या पालकांना या घटनेविषयी सांगितले. मुलींच्या पालकांनी कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्यात गाठले आणि शिक्षकाच्या विरोधात तक्रार दाखल केली. या घटनेपासून आरोपी शिक्षक फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मीठमुंबरी-बागवाडी जेटीवरील बोटिंग प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Shraddha Dubey: मॉडेलिंगच्या नावाखाली काळा धंदा! ब्लॉगरच्या फ्लॅटवर छापा पडताच समोर आला धक्कादायक प्रकार

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

ज्ञानेश कुमारांना सोडणार नाही! सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार; राहुल गांधींचा सर्वात मोठा निर्णय

Mobile Use In Toilet: टॉयलेटमध्ये मोबाईल वापरल्याने होऊ शकतो मूळव्याध, आजपासून सोडा ती वाईट सवय

SCROLL FOR NEXT