Amravati Crime Saam Tv
क्राईम

Amravati Crime : अमरावतीत 15 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; सरपंचाच्या मुलाला अटक

Sarpanch son arrested for physically abusing a 15-year-old girl : अमरावतीत 15 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सरपंचाच्या मुलाला अटक करण्यात आलीय.

Rohini Gudaghe

अमर घटारे, साम टीव्ही अमरावती

एसटी बसची वाट पाहत असलेल्या एका 15 वर्षीय विद्यार्थिनीला सरपंचाच्या मुलाने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवले. त्यानंतर सुसाट वेगाने दुचाकी जंगलाच्या दिशेने नेली. तिथे अंधाराचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही संतापजनक घटना अमरावती जिल्ह्यातील मार्डी परिसरात शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.

याप्रकरणी कुऱ्हा पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या घटनेनं परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी नववीच्या वर्गात शिकते. गावापासून शाळा दूर असल्याने दररोज ती एसटी बसने प्रवास करते.

शनिवारी सायंकाळी पीडित विद्यार्थिनी बस स्टँडवर बसची वाट पाहत उभी होती. यावेळी गावातील सरपंचाचा मुलगा तिथे आला. आता बस येणार नाही, मी पण गावाकडे निघालो आहे, असं म्हणत त्याने पीडितेला दुचाकीवर बसण्यास म्हटले.

तेव्हा पीडित विद्यार्थिनीने सुरुवातीला नकार दिला. मात्र, बराच वेळ वाट पाहूनही बस आली नसल्याने तिने आरोपीच्या मोबाइलवरून आपल्या आई-वडिलांना फोन केला. बस मिळत नसल्यामुळे मी सरपंचाच्या मुलासोबतच घरी येत असल्याची माहिती पीडितेने आपल्या कुटुंबियांना दिली.

पीडितेला दुचाकीवर घेऊन आरोपी गावाकडे निघाला. मात्र, वाटेतच त्याची नियत फिरली. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन त्याने गाडी जंगलाच्या दिशेने नेली. तिथे पीडितेला जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

अत्याचारानंतर आरोपीने तिला घरी आणून सोडले. घरी येताच पीडितेने घडलेला प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT