Crime News  Saam Tv
क्राईम

Crime News: लग्नाच्या २५ दिवसांनी पत्नीनं गळफास घेतला, नैराश्यात पतीनंही जीवनयात्रा संपवली, जोडप्याच्या मृत्यूचं नेमकं कारण काय?

Crime News: एका नवविवाहित जोडप्याने केलेल्या आत्महत्येमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. २५ एप्रिल रोजी विवाहबंधनात अडकलेल्या या कपलचे आयुष्य अवघ्या २७ दिवसांतच संपले.

Shruti Vilas Kadam

Crime News: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे एका नवविवाहित जोडप्याने केलेल्या आत्महत्येमुळे संपूर्ण शहर हादरून गेले आहेत. एका महिन्यापूर्वीच लग्नाच्या आनंदाने गजबजलेली दोन्ही कुटुंबे आता शोकासागरात बुडाली आहेत. लग्नानंतर अवघ्या २७ दिवसांतच या नवविवाहित जोडप्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या संपूर्ण प्रकाराचा पोलीस तपास घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ एप्रिलला मेघा आणि सिद्धार्थ या जोडप्याचे थाटामाटात लग्न झालं. लग्नानंतर काही दिवसांनी नवीनवरी मेघा आपल्या माहेरी, म्हणजेच मोरार येथील घरी गेली होती. ती १ मे रोजी आपल्या आई-वडिलांच्या घरी गेली. त्यानंतर, २० मे रोजी तिने एका ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. या नवीनवरीच्या मृत्यूच्या बातमीने दोन्ही कुटुंबांमध्ये एकच हाहाकार उडाला.

पत्नीच्या मृत्यूमुळे तिचा सिद्धार्थ पूर्णपणे कोलमडून गेला होता. तो मानसिक धक्क्यात गेल्याचे सांगितले जाते. पत्नीच्या निधनानंतर दोन दिवसांनी म्हणजेच २२ मे रोजी सिद्धार्थनेही पिंटो पार्क येथील आपल्या घरातील बाथरुममध्ये गळफास लावून आत्महत्या केली.

पोलिसांकडून तपास सुरू

या घटनेनंतर, पोलिसांनी या दोन्ही घटनांची नोंद केली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांचे पथक सध्या तांत्रिक पुरावे आणि मोबाईल फोनवरील रेकॉर्डिंग्जच्या मदतीने या आत्महत्येमागील कारणं शोधण्याचे काम करत आहे. आतापर्यंत, दोन्ही कुटुंबांपैकी कोणीही कोणावरही कोणताही आरोप केलेला नाही.

सीएसपी (CSP) अतुल सोनी यांनी सांगितले की, या प्रकरणाचा सध्या तपास सुरु आहे. पोलीस सर्व संभाव्य पैलूंचा विचार करून सखोल चौकशी करत आहेत. तसेच, या आत्महत्येमागील मूळ कारण शोधण्याच्या उद्देशाने ते तांत्रिक पुरावे जसे की मोबाईल फोनवरील रेकॉर्डिंग्जचीही तपासणी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT