kristina joksimovic Death Case: Saamtv
क्राईम

Model Death: मॉडेलची निर्घृण हत्या! पतीने गळा दाबून संपवलं, ब्लेंडरमध्ये मृतदेहाचे तुकडे केले, मिक्सरमध्ये घातले अन्... भयंकर घटना

kristina joksimovic Death Case: पतीने आधी पत्नीची हत्या केली त्यानंतर कात्रीने तुकडे करत मिक्सरमध्ये बारीक केले त्यानंतर फेकून दिले. पोलिसांनी याबाबत अधिक तपास करत नराधम पतीला अटक केली असून त्याने पत्नीच्या हत्येची कबुलीही दिली आहे.

Gangappa Pujari

Switzerland Model Death: माजी मिस स्वित्झर्लंड विजेत्या मॉडेलचा तिच्याच पतीने अत्यंत क्रुरपणे गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. क्रिस्टीना जोक्सिमोविच असे या मॉडेलचे नाव असून थॉमस असे आरोपी पतीचे नाव आहे. नराधम पतीने आधी पत्नीची हत्या केली त्यानंतर कात्रीने तुकडे करत मिक्सरमध्ये बारीक केले अन् स्वित्झर्लंडमधील बासेलजवळील बिनिंगेन भागात फेकले. फेब्रुवारी २०२४ मध्ये ही भयंकर घटना घडली होती, ज्याचा सात महिन्यांनी खुलासा झाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, माजी मिस स्वित्झर्लंड फायनलिस्ट क्रिस्टीना जोक्सिमोविचला तिच्या पतीने गळा दाबून संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये तिचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळल्यानंतर हे प्रकरण समोर आले होते. याबाबत आता मोठा खुलासा झाला आहे. पतीने आधी पत्नीची हत्या केली त्यानंतर कात्रीने तुकडे करत मिक्सरमध्ये बारीक केले त्यानंतर फेकून दिले. पोलिसांनी याबाबत अधिक तपास करत नराधम पतीला अटक केली असून त्याने पत्नीच्या हत्येची कबुलीही दिली आहे.

आरोपी हा मानसिक आजारी आहे. ही हत्या स्वसंरक्षणार्थ झाल्याचे थॉमसने सांगितले होते, ज्यामुळे त्याला जामीन देण्यात यावा, अशी मागणी त्याने केली होती. मात्र त्याची ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सुरुवातीला त्याच्या पत्नीने त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता ज्यामुळे तो घाबरला आणि पत्नीचा गळा दाबला. हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करण्यात आले, त्यानंतर त्यात केमिकल टाकून ते फेकून दिले, अशी कबुली आरोपीने दिली आहे.

क्रिस्टीना ही मूळची सर्बियन होती, तिचा जन्म बिनिंगेन येथे झाला. क्रिस्टीना जोक्सिमोविचने 2003 मध्ये मॉडेलिंगमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. मिस नॉर्थवेस्ट स्वित्झर्लंडचा किताब पहिल्यांदाच जिंकला. यानंतर, ती 2008 च्या मिस स्वित्झर्लंड स्पर्धेत विजेती ठरली. दरम्यान, दोघांमध्ये अनेक दिवसांपासून भांडण होत असल्याचा खुलासा महिलेच्या मित्राने केला होता. हत्येच्या काही आठवड्यांपूर्वी क्रिस्टीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पती आणि मुलांसोबतचे व्हेकेशनचे फोटो शेअर केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bajra Dhapate Recipe : नाश्त्याला काय? फक्त १० मिनिटांत बनवा खमंग - पौष्टिक बाजरीचे धपाटे

Maharashtra Live News Update: काँग्रेस वंचित बहुजन आघाडीशी युती करणार

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; अमृतांजन पुलाच्या खांबाला धडकून ट्रकचा चक्काचूर, केबिनमध्ये अडकला ड्रायव्हरचा मृतदेह

Tata Sierra: टाटा सिएरासाठी विक्रमी मागणी, पहिल्या दिवशी ७०,०००पेक्षा जास्त ऑर्डर्स, वाचा खास वैशिष्ट्ये

Dhananjay Munde: मंत्रीपदासाठी फिल्डिंग; इकडे कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार, तिकडे धनंजय मुंडेंची दिल्लीवारी

SCROLL FOR NEXT