Crime News Saam tv
क्राईम

Crime News: लग्नाचे आमंत्रण दिले नाही, नाराज मित्रांनी नवरदेवाचं घर गाठलं; वडिलांना मारहाण करत गोळी झाडली

Uttar Pradesh Crime News: लग्नाचे आमंत्रण दिले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या तरुणांनी दारू पिऊन मित्राचे घर गाठले. हळदी समारंभातच नवरदेवाच्या घरामध्ये राडा केला आणि त्याच्या वडिलांवर गोळी झाडली.

Priya More

लग्नाचे आमंत्रण दिले नाही त्यामुळे संतापलेल्या तरुणाने आपल्या मित्राच्या वडिलांवर गोळी झाडली. ही घटना उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये घडली. लग्नाची पत्रिका दिली नाही त्यामुळे नाराज झालेल्या मित्राने दारूच्या नशेत हे कृत्य केले आहे. लग्नाच्या आदल्या दिवशीच या तरुणाने मित्राच्या वडिलांवर गोळी झाडली. या गोळीबारात नरदेवाचे वडील गंभीर जखमी झालेत. या घटनेमुळे गाझियाबादमध्ये खळबळ उडाली आहे. लग्न घरामध्ये लगीनघाई सुरू असतानाच हा प्रकार घडल्यामुळे गोंधळ उडाला.

मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादमध्ये लग्नाचे आमंत्रण न मिळाल्याने नाराज झालेल्या तरुणाने लग्नाच्या आदल्या दिवशीच आपल्या मित्राच्या वडिलांवर गोळीबार केला. दारूच्या नशेत या तरुणाने मित्राच्या वडिलांवर गोळ्या झाडल्या. ही घटना गाझियाबादमधील ट्रोनिका सिटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. लग्नाचे आमंत्रण दिले नाही म्हणून या तरुणाने आधी मित्राच्या वडिलांना मारहाण केली. त्यानंतर त्यांच्यावर गोळी झाडली. या गोळीबारामध्ये नवरदेवाच्या वडिलांच्या हाताला गोळी लागली. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी सांगितले की, गाझियाबादच्या ट्रोनिका सिटी पोलिस स्टेशन परिसरातील मंडोला पोलिस स्टेशन परिसरातील आसरा सोसायटीमध्ये राहणारा दीपांशूचे २२ तारखेला लग्न होणार आहे. त्यासाठी घरात हळदीची तयारी सुरू होती. दीपांशूने त्याचे मित्र वंश आणि तरुण यांना लग्नाला आमंत्रित केले नाही. दारू पिऊन वंश आणि तरुण दीपांशूच्या घराबाहेर पोहोचले आणि शिवीगाळ करू लागले. घरामध्ये असणारे सर्व पाहून हा तमाशा पाहत होते.

दीपांशूचे वडील सोनू यांनी वंश आणि तरुण यांना विरोध केला तेव्हा त्यांनी आधी त्यांना मारहाण केली आणि नंतर पिस्तूल काढून गोळी झाडली. गोळी दीपांशूच्या वडिलांच्या हाताला लागली. घटनास्थळी जमलेल्या लोकांनी दिपांशूच्या वडिलांना ताबडतोब उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर तरुण आणि वंश घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींच्या शोधासाठी पथके तयार केली आहेत. या घटनेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

ZP ची बनावट कागदपत्रं बनवून उभारली इमारत; शिंदे गटाच्या दोन नेत्यांना अटक

Sharad Pawar : महायुतीत चौथा भिडू येणार? पवारांच्या एन्ट्रीनं शिंदेंचं टेन्शन वाढणार?

जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, डिलिमिटेशनसाठी पवार एनडीएसोबत? दिग्गज नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: आमदार-नगरसेवक वाचवण्यासाठी धावाधाव; ठाकरे सेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT