Haryana Crime Google
क्राईम

Crime News: आई की राक्षसीण! पोटच्या मुलीवर बॉयफ्रेंडला करायला लावला बलात्कार, नंतर...

Haryana Crime News: आई-मुलीच्या पवित्र नात्याला कलंक लावल्याची घटना घडलीय. या महिलने आपल्या प्रियकराला आपल्याच मुलीवर अत्याचार करायला सांगितले.

Bharat Jadhav

आई आणि मुलीचं नातं हे विश्वासाचे आणि प्रेमाचे असते. परंतु या नात्याला काळिमा फासण्याची घटना घडलीय. एका महिलेने आपल्या प्रियकराला स्वतःच्या मुलीवर बलात्कार करायला लावल्याची घटना घडलीय. इतकेच नाहीतर बलात्कार केल्यानंतर आई रुपी राक्षसीणीने पोटच्या मुलीचा खून केला. ही घटना हरियाणाच्या कैथल जिल्ह्यात घडली. या घटनेमुळे आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासला गेलाय.

या घटनेची सत्यता समोर आल्यानंतर पोलीस चक्रावून गेलेत. मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या कैथल जिल्ह्यात 21 मे रोजी एका अल्पवयीन मुलीचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली. पोलिसांनाही अपघातातच मुलीचा मृत्यू झाल्याचं वाटलं होतं. परंतु पोलिसांनी आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा केला आहे. एका अधिकाऱ्यानुसार, बलात्कारानंतर मुलीची हत्या करण्यात आल्याची माहिती दिलीय.

सत्य कसं बाहेर आलं?

आरोपी महिलेने आपल्या पतीला मुलीसोबत घडलेल्या गोष्टीची माहिती दिली. ते ऐकून पतीच्या पायाखालची जमीन सरकली. मुलीच्या श्राद्धच्या दिवशी आरोपी महिलेनं पतीला मुलीबाबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. ते ऐकून मृत मुलीच्या वडिलांचा थरकाप उडाला. आरोपी महिलेचा पतीने लगेच पोलीस स्टेशन गाठत आपल्या पत्नी विरोधात तक्रार नोंदवली.

नवऱ्यासमोर सांगितला भयानक किस्सा

कैथल जिल्ह्यात रादौर क्षेत्रात धौलरा गावाजवळ रस्ता क्रॉस करताना एका अल्पवयीन मुलीचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची पोलिसांना सूचना मिळाली. पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा त्यांच्या पायाखालची जमिनी सकरेल अशी माहिती समोर आली.

मुलीचा मृत्यू ट्रक अपघातात झाला नव्हता तर मुलीच्या आईने आपल्या बॉयफ्रेंडला मुलीवर बलात्कार करायला लावला होता. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली होती. हत्या केल्यानंतर त्याला अपघाताचे स्वरुप देण्यासाठी मुलीचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला होता. मृत्यूला दुर्घटना दाखवण्यासाठी ट्रक चालकाची मदत घेतली होती.

मुलीच्या श्राद्धाच्या दिवशी आरोपी महिलेने स्वत:च पतीला सत्य सांगितलं. मुलीचा मृत्यू रस्ते अपघातात झाला नव्हता. तिनेच तिच्या प्रियकराला मुलीवर बलात्कार करायला लावला. या दरम्यान मुलीला बेशुद्ध ठेवण्यासाठी दिलेल्या औषधाच्या ओव्हरडोसमुळे तिचा मृत्यू झाला. दरम्यान पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मृत मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मुलीची आई, तिची मैत्रीण रेखा, प्रियकर लाडी, त्याचा भाऊ रणजीत, शेजारी मिट्ठू, डॉक्टर राजेश आणि ड्रायव्हर रणजीत सरदार यांच्याविरुद्ध हत्या आणि पॉक्सोसह वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा नोंदवलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुर्यवंशी मृत्यू प्रकरण; सोमनाथच्या मृत्यूशी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Prajakta Mali: प्राजक्ता जणू सौंदर्याची खाण...

Parbhani : आदर्श शेतवाटणी! दोन प्राध्यापक भावांनी शेतकरी भावाला दिला अधिक हिस्सा; मुलांचे शिक्षण व लग्नाचीही घेतली जबाबदारी

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

SCROLL FOR NEXT