body of woman sub inspector found in bathroom  Saam Tv
क्राईम

Crime News: महिला पोलीस उपनिरीक्षकाचा बाथरूममध्ये आढळला मृतदेह; वडिलांच्या कॉलमुळे धक्कादायक प्रकार उघड

Crime News: ग्रेटर नोएडातील जारचा पोलीस ठाण्यात कार्यरत महिला उपनिरीक्षक रश्मी गौतम यांचा मृतदेह बाथरूममध्ये आढळला. वडिलांच्या फोननंतर हा प्रकार उघडकीस आला असून तपास सुरू आहे.

Shruti Vilas Kadam

Crime News: उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जारचा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका महिला उपनिरीक्षकाचा मृतदेह त्यांच्या राहत्या खोलीतील बाथरूममध्ये आढळला आहे. रश्मी गौतम असे मृत महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

वडिलांनी फोन केला, पण रश्मी यांनी प्रतिसाद दिला नाही

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी रश्मी गौतम यांच्या वडिलांनी त्यांना फोन केला होता. मात्र, अनेकदा फोन करूनही रश्मी यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे त्यांच्या वडिलांना काळजी वाटू लागली. त्यांनी जवळच राहणाऱ्या एका सहकारी उपनिरीक्षकाला फोन करून रश्मी यांची चौकशी करण्यास सांगितले. यानंतर संबंधित अधिकारी रश्मी यांच्या खोलीजवळ पोहोचले. त्यावेळी खोलीचा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी अनेकदा आवाज देऊनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी तातडीने पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.

दरवाजा तोडला अन् बाथरूममध्ये आढळला मृतदेह

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. त्यानंतर खोलीचा दरवाजा तोडण्यात आला. आत गेल्यानंतर रश्मी गौतम बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळल्या. ही घटना पाहून उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनाही मोठा धक्का बसला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. त्यांच्या मृत्यूमागे नेमके काय कारण आहे, याचा शोध घेतला जात आहे.

२०२३ च्या बॅचमधील उपनिरीक्षक होत्या रश्मी गौतम

रश्मी गौतम या २०२३ च्या बॅचमधील महिला उपनिरीक्षक होत्या. २०२४ पासून त्या जारचा पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. त्या मूळच्या उत्तर प्रदेशातील कानपूर नगर येथील रहिवासी होत्या. विशेष म्हणजे त्यांचे वडीलही उत्तर प्रदेश पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत.

शवविच्छेदन रिपोर्टनंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार

रश्मी गौतम यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पुढील रिपोर्टनंतरच आवश्यक ती कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचं व्हॉट्सॲप हॅक?

Eknath Shinde: उद्धव यांची शहांवर टीका; शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले, ठाकरे थापाडे!

Donald Trump-PM Modi : मोदी 'टफ मॅन'; ट्रम्प यांच्याकडून कौतुक, QUAD नेत्यांच्या बैठकीतून केली सर्वात मोठी घोषणा

शाळांमध्ये प्रवेशासाठी मुलांच्या मुलाखती, लेखी-तोंडी परीक्षा घेता येणार नाहीत; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय; वाचा नवीन नियम जाहीर

School Admission Rules : शाळेच्या प्रवेशासाठी डोनेशन घ्याल तर याद राखा! नियम मोडणाऱ्या शाळांवर होणार कारवाई

SCROLL FOR NEXT