Police Raid Prostitution Den Saam Tv
क्राईम

Sambhajinagar News: संभाजीनगरमध्ये देहविक्री अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 2 परप्रांतीय तरुणींसह 4 महिलांची सुटका

Police Raid On Prostitution Den: छत्रपती संभाजी नगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. देहविक्री अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. 4 तरुणींची सुटका केल्याची माहिती मिळत आहे.

Rohini Gudaghe

रामनाथ ढाकणे

Latest Sambhajinagar Crime News

छत्रपती संभाजी नगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) गेल्या काही दिवसांपासून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची प्रकरणं समोर येत आहेत. पोलीस या प्रकरणी कारवाई देखील करत आहेत. मागील महिन्यात देखील छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी मोठ्या वेश्याव्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश (Prostitution) केला होता. आताही पोलिसांनी अशीच मोठी कारवाई केली आहे. (Latest Crime News)

छत्रपती संभाजी नगरमध्ये देहविक्री अड्ड्यावर पोलिसांचा छापा टाकला. या कारवाईत त्यांनी 4 तरुणींची सुटका केल्याची माहिती मिळत आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये चिकलठाणा परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. चिकलठाणा परिसरात (Chikalthana Area) अवैधरित्या वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'अशी' केली कारवाई

हॉटेल सिद्धांत बियर बारमध्ये अवैधरित्या वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये पोलिसांनी 2 परप्रांतीय तरुणींसह 4 महिलांची सुटका (Prostitution Den) केली. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाच्या सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांना या प्रकरणाची मिळाली होती.

त्यानंतर पोलिसांनी (Sambhajinagar Police) या ठिकाणी बनावट ग्राहक पाठविला होता. बनवाट ग्राहकाने पोलिसांच्या पथकाला इशारा दिला. ग्राहकाकडून इशारा मिळताच पथकाने छापा टाकून ही कारवाई केली. दरम्यान या प्रकरणी आरोपी जिवन केसरसींग जालवाल याच्या विरुद्ध चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला (Police Raid) आहे.

यापूर्वीची कारवाई

छत्रपती संभाजीनगर शहरातील हाय प्रोफाईल वेश्याव्यवसाय प्रकरणी हरसूल पोलिसांनी जानेवारी महिन्यात पुण्यातील एका डॉक्टरसह दलाल असणाऱ्या महिलेला अटक केली (Crime News) होती. शहरात बांग्लादेशी मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी पोलिसांचे एक पथक पुण्याला पाठविण्यात आले होते.

हरसुल पोलिसांनी मुलीची तस्करी करून खरेदी विक्री करणाऱ्या पुण्यातील डॉक्टरसह एजंट महिलेला अटक केली (Prostitution In Sambhajinagar ) होती. या प्रकरणात अटकेतील आरोपींची संख्या पाचवर गेली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रक्ताचं पाणी होईपर्यंत वहिनींच्या पाठीशी उभे राहू : हसन मुश्रीफ

भाजप कार्यकर्त्याच्या घरावर बॉम्ब फोडला, आवाजाने परिसर हादरला; बचाव पथक मदतीला धावलं

Monday Important Remedies: घरात पैशांची तंगी सुरू आहे? सोमवारी हे 5 उपाय करा, महादेवाच्या कृपेने होईल भरभराट

Jalna: जालन्यात ज्वालामुखी? जमिनीतून निघतोय ज्वलनशील पदार्थ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; पाहा VIDEO

Water Shortage : नागपूरकरांसाठी महत्वाची बातमी! २ दिवस शहरातील पाणी पुरवठा राहणार बंद, कोणत्या परिसरांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT