Chhatrapati Sambhajinagar Latest News: Saamtv
क्राईम

Chhatrapati Sambhajinagar: धक्कादायक! करार संपला तरी भाडेकरु जागा सोडेना, वृद्ध दांपत्यावर रात्रभर बाहेर झोपण्याची वेळ; प्रकरण काय?

Chhatrapati Sambhajinagar Latest News: २०२० मध्ये त्यांनी एका व्यक्तीला घरासमोरील जागा किराणा, डेली निड्स व्यवसायासाठी भाड्याने दिली. मात्र आता हा करार संपल्यानंतरही भाडेकरुन जागा सोडत नसल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर, ता. २५ जून २०२४

भाडेकरुच्या त्रासाला वैतागून वृद्ध दांपत्याला रात्रभर घराबाहेर झोपावे लागल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको वन या उच्चभ्रू वसाहतीत घडला. भाडेकरूकडून होत असलेल्या त्रासाबद्दल अनेक वेळा तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने हे पाऊल उचलल्याचे या जोडप्याने सांगितले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एलीझाबेथ बत्रा (वय, ७०) आपल्या ७६ वर्षीय पतीसोबत छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको एन-१ परिसरात राहतात. २०२० मध्ये त्यांनी एका व्यक्तीला घरासमोरील जागा किराणा, डेली निड्स व्यवसायासाठी भाड्याने दिली. मात्र आता हा करार संपल्यानंतरही भाडेकरुन जागा सोडत नसल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.

एलीझाबेथ यांच्या तक्रारीनुसार, सप्टेंबर २०२३ पर्यंत त्यांनी रीतसर लिव्ह अँड लायसन्सचा करार केला होता. जून २०२३ मध्ये त्यांनी संबंधित भाडेकरूला जागा खाली करण्याची नोटीस दिली होती. मात्र सप्टेंबर उलटल्यानंतर त्याने ही जागा सोडली नाही. याबाबत वृद्ध दांपत्याने पोलिसांकडे वारंवार तक्रार केली.

पोलिसांकडून दखल न घेतली गेल्याने त्यांनी न्यायालयातही धाव घेतली, मात्र न्याय मिळत नसल्याने त्यांनी अखेर सोमवारी रात्री घराबाहेर झोपून आंदोलन सुरू केले. ही बाब कळताच एमआयडीसी सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत पोलिस त्यांची समजूत काढली. मात्र ते आपल्या आंदोलनावर ठाम राहिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वारकरी संप्रदायातील घुसखोरीचा वाद पेटला, राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंवर शाईफेक

सुप्रिया सुळे यांच्या कारचा अपघात; मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भरधाव वाहनाने दिली धडक

अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट, वहिनीनं दीराला ऊसाच्या शेतात बोलावलं; रागाच्या भरात गुप्तांग कापलं, धक्कादायक कारण

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana : 1.81 कोटी महिलांच्या बँक खात्यात कधी पैसे येणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा

SCROLL FOR NEXT