संभाजीनगरमध्ये आईने मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना
मृतदेह गादीत गुंडाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
रिक्षाचालकाच्या माहितीमुळे पोलिसांनी गुन्हा उघड केला
आई, सावत्र वडील आणि इतरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
माधव सावरगावे, छत्रपती संभाजीनगर
Sambhajinagar Nandini Dhivare Murder Case Update छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरात १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या त्या हत्येचं धक्कादायक कारण उघडकीस आली आहे. एक कुटुंब तिसगाव चौफुली येथे त्यांच्या गादीत संशयास्पदरीत्या काहीतरी गुंडाळून घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गादीची तपासणी केली. गादी उघडून पाहिले असता त्यामध्ये २० वर्षीय नंदणी राजू धिवरे या तरुणीचा मृतदेह आढळून आला. सुरुवातीला मुलीच्या आईने तिने आत्महत्या केली असल्याचं म्हटलं. मात्र आता या घटनेचा उलगडा झाला असून त्याचे आईनेच मुलीचा गळा दाबून हत्या केली आहे. या हत्येचं कारण देखील उघड झालं आहे.
प्रेमविवाह केलेल्या मुलीने नवऱ्याला सोडून पुन्हा दुसऱ्या तरुणासोबत सूत जुळविले. त्यावरून झालेल्या भांडणानंतर रागाच्या भरात आईने पोटच्या मुलीचा प्लास्टिक पाईपने गळा आवळून खून केला. तसेच पती आणि भावाच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह गादीमध्ये गुंडाळून गावाकडे नेत असताना रिक्षाचालकाने दिलेल्या माहितीवरून पोलिसांना खुनाच्या घटनेचा उलगडा केला.
नंदिनी राजू धिवरे असे खून झालेल्या तरुणीने नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी नंदिनीची आई भारती उमेश साबळे व सावत्र वडील उमेश गोविंद साबळे यांना अटक केली आहे. मुलीचा मृतदेह गादीत गुंडाळून गावाकडे नेऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू होता.
मात्र, तीसगाव चौफुली पुलाजवळ पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार गुरुवारी रात्री उघड झाला. शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुलीच्या आई- वडिलांसह तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.