CHHATRAPATI SAMBHAJINAGAR: FIRING ATTEMPT AFTER GROUP CLASH; COUNTRY-MADE PISTOL, LIVE CARTRIDGES SEIZED saam tv
क्राईम

Crime News: म्हाडा कॉलनीत दोन गटात हाणामारी; मारामारीदरम्यान एकानं जमावावर ताणली बंदूक अन्...

Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरमधील सातारा परिसरात दोन गटात वाद झाला. हाणामारीनंतर एकाने जमावावर बंदूक ताणली असून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

Bharat Jadhav

  • सातारा परिसरातील म्हाडा कॉलनीत दोन गटांमध्ये हाणामारी

  • जुन्या वादातून झालेल्या भांडणानंतर गोळीबाराचा प्रयत्न

  • पोलिसांनी एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे आणि एक कोयता जप्त केला

छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा परिसरात झालेल्या दोन गटातील हाणामारीनंतर गोळीबार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी एकाकडून गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतुसे आणि एक कोयता जप्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा परिसरात झालेल्या दोन गटातील हाणामारीनंतर गोळीबार झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी एकाकडून गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतुसे आणि एक कोयता जप्त केला आहे. दोन्ही गटात बाचाबाची झाली, त्यानंतर त्यांच्या हाणामारी झाली. त्यानंतर एका तरुणाने गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी एका गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतुसे आणि एक कोयता जप्त केला आहे. या घटनेमुळे म्हाडा कॉलनी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणात एक अल्पवयीन मुलगाही ताब्यात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर काही तरुण अल्पवयीन मुलांना गावठी कट्टा चालवण्याचे प्रशिक्षण देत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. प्रत्यक्ष गोळीबार झाला नसल्याचे पोलिस निरीक्षकांनी स्पष्ट केले असून, पुढील तपास सातारा पोलीस करत आहेत.

भांडणात तोडली मुलाची बोटे, देहूरोड परिसरातील घटना

मावळच्या देहूरोड परिसरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भर दिवसा झालेल्या मुलांच्या भांडणात एका युवकाच्या हाताचे बोट तोडल्याची धक्कादायक घटना घडलीये, किरकोळ कारणावरून कोयत्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. सलग घडणाऱ्या या गंभीर प्रकारांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT