Crime News Saam tv
क्राईम

Crime News: शिवी दिल्याच्या रागातून भयंकर कांड.. चौघांनी मिळून जिवलग मित्राला संपवलं; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Chhatrapati Sambhajinagar Crime: शिवीगाळ केल्याच्या रागातून चार जणांनी मिळून आपल्याच मित्राची हत्या केल्य्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gangappa Pujari

रामू ढाकणे, छत्रपती संभाजीनगर|ता. ५ मे २०२४

शिवीगाळ केल्याच्या रागातून चार जणांनी मिळून आपल्याच मित्राची हत्या केल्य्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली. या धक्कादायक घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चार जणांविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मित्राच्या आईला शिवीगाळ केल्याच्या वादातून चार मित्रांनी मिळून आपल्याच एका २० वर्षीय मित्राची पोटात चाकू खुपसून हत्या केली आहे.अतुल बाबासाहेब खाडे असे मृत तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी मुख्य आरोपी विशाल रमेश कळकुंबे आणि रोहन बनकर, वैभव उगले, सुशांत उपदेशी आणि सागर जाधव असे मारेकऱ्यांचे नाव आहे. त्यांच्याविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी मारेकरी विशालची आई अतुलसोबत फिरू नको म्हणत मुलाला खडसावतानाअतुललाही रागावली होती. त्यामुळे अतुलचा विशालवर राग होता.

याच रागातून अतुलने विशालच्या आईला फोन करून शिवीगाळ केली त्यामुळे या दोघांमध्ये वाद सुरू झाले. हा वाद मिटवण्याचा बहाणा करून विशालने अतुलची भेट घेतली. अतुलला मिठी मारून पोटात चाकू खुपसला यात अतुलचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : चालता चालता जमिनीवर कोसळले, पोलिस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू |CCTV

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांकडून घायवळ कुटुंबियांवर कारवाईचा बडगा

Pooja Sawant: असं सौंदर्य पाहिलं अन् मनात काहूर माजलं

Nashik : नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला! पोलिसांनी उतरवला केंद्रीय मंत्र्यांच्या निकटवर्तीयांचा माज, काय आहे प्रकरण?

World Cup 2027: रोहित-कोहली २०२७ चा वर्ल्ड कप खेळणार का? काय म्हणाला कर्णधार गिल?

SCROLL FOR NEXT