Maharashtra Breaking News:  Saamtv
क्राईम

Chhatrapati Sambhajinagar Crime: दिवसाढवळ्या बँक मॅनेजरच्या घरात चोरी, अवघ्या वीस मिनिटात ९ तोळे सोने लंपास; CCTV Footage समोर

Maharashtra Breaking News: या सोसायटीला स्वतंत्र सुरक्षारक्षक आहे मात्र अनोळखी व्यक्ती थेट लिफ्टमधून सातव्या मजल्यापर्यंत पोहोचला आणि प्रवेश केल्यापासून पुढच्या वीस मिनिटात त्याने हा डल्ला मारला.

Gangappa Pujari

राम ढाकणे, छत्रपती संभाजीनगर|ता. २२ जून २०२४

छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये दिवसाढवळ्या 20 मिनिटात 9 तोळे सोने लंपास केल्याची घटना घडली आहे. टोपी आणि बूट घालून चोरट्याने सातव्या मजल्यावर जात एका बँक मॅनेजरच्या घरात डल्ला मारला. हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा परिसरातील एका अपार्टमेंट मध्ये टापटीप कपडे, टोपी आणि बूट घालून चोरट्याने सातव्या मजल्यावर जात अवघ्या 20 मिनिटात 9 तोळे सोने लंपास केल्याची घटना घडली. दिवसा ढवळ्या चोरी करणारा हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

एका खाजगी बँकेत असलेल्या बँक मॅनेजरच्या घरात ही चोरी झाली. या सोसायटीला स्वतंत्र सुरक्षारक्षक आहे. मात्र अनोळखी व्यक्ती थेट लिफ्टमधून सातव्या मजल्यापर्यंत पोहोचला आणि प्रवेश केल्यापासून पुढच्या वीस मिनिटात त्याने हा डल्ला मारला.

कुटुंबातील सर्वच सदस्य हे खाजगी नोकरी असल्याने तिघेही नेहमीप्रमाणे नोकरीवर गेले मात्र सायंकाळी घरी परतल्यावर हा सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. दरम्यान हे संपूर्ण प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT