Sambhajinagar Crime  Saam tv
क्राईम

Sambhajinagar Crime: अल्पवयीन मुलांचं ८ जणांनी केलं अपहरण; निर्वस्त्र करत मारहाण आणि चित्रीकरण, जीवे मारण्याची धमकी

Minors Kidnapping In Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पवयीन मुलांचं आठ जणांनी अपहरण केल्याची घटना घडली आहे. त्यांना निर्वस्त्र करत मारहाण करून चित्रीकरण देखील केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Minors Kidnapping Beating Filming naked

छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhajinagar) चिकलठाणा परिसरात एका कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या दोन अकरावीच्या विद्यार्थ्यांचं आठ जणांच्या टोळक्याने अपहरण केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर त्यांना निर्वस्त्र करत मारहाण करून चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. (Latest Crime News)

कोचिंग क्लास संपल्यानंतर हे दोन विद्यार्थी मित्रांसोबत घरी जात होते. मात्र, मॉस्को कॉर्नर चौकातून घरी जात असताना चार दुचाकीस्वारांनी त्यांना अडवलं. जबरदस्ती शहरातील नागेश्वरवाडी येथील एका फ्लॅटवर नेत त्यांना धारदार चाकूचा धाक दाखवून कपडे फाडत बांबूच्या रॉडने (Crime news) बेदम मारहाण केली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मारहाण केल्यानंतर चित्रीकरण केलं

मारहाण केल्यानंतर त्यांची जबरदस्तीने व्हिडिओ रेकॉर्डिंग केली आहे. दरम्यान याप्रकरणी छोटू झिरपे सह 16 अज्ञात आरोपींविरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला ( Sambhajinagar news) आहे. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. युवतीला धक्का दिल्याच्या कारणावरून या अल्पवयीन मुलांचं अपहरण केल्याची माहिती मिळतेय.

मारहाणीनंतर आरोपींनी दोघांचे कपडे फाडले. त्यांचे चित्रीकरण केलं. यापुढे तरुणीला त्रास देणार नाही, असं बळजबरीनं त्यांच्याकडून वदवून घेतलं. पोलीस ठाण्यात गेल्यास जीवे मारण्याची धमकी (Minors Kidnapping) दिली. त्यानंतर दोघांना रात्री त्यांनी सोडून दिले. जखमी अवस्थेत घरी पोचल्यानंतर पालकांना त्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला.

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

यानंतर त्यांनी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे. तपास उपनिरीक्षक सचिन जाधव करीत आहेत. ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली (Minors Kidnapping In Sambhajinagar) आहे. बुधवारी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. घटनेमुळे परिसरात भितीचं वातावरण (Minors Kidnapping Beating Filming naked)आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

Anurag Dwivedi Case: लॅम्बोर्गिनी ते थार...; युट्यूबरच्या घरी ईडीचा छापा, दुबईतील क्रूझवर लग्न केल्याने संशय वाढला

Green Chutney Potato Slices : हिरव्या चटणीचे झणझणीत आणि कुरकुरीत बटाट्याचे काप, एकदा करुनच बघा

New Year 2026 Horoscope: २०२६ हे वर्ष तुमच्यासाठी कसं असेल? वाचा संपूर्ण १२ राशींचं भविष्य

Yuzvendra Chahal: भारतीय खेळाडू युजवेंद्र चहलची तब्येत बिघडली; २ गंभीर आजारांची झालीये लागण

SCROLL FOR NEXT