buldhana sp suspends police for posting illegal post on social media Saam tv
क्राईम

Social Media त आक्षेपार्ह मजकूर टाकला, एसपींकडून पाेलिस निलंबित

Buldhana Police : बुलढाणा पोलिस मुख्यालयात पार पडलेल्या नियमित गुन्हे आढावा बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना दक्ष राहण्याचे निर्देश एसपी सुनील कडासने यांनी दिले.

संजय जाधव

Buldhana Crime News :

समाज माध्यमावर कार्यकर्ते किंवा नागरिकांनी आक्षेपार्ह मजकूर टाकण्याच्या घटना आपण वाचतो. मात्र एका पोलिस कर्मचाऱ्याने असा मजकूर टाकल्याचे निदर्शनास आले. अन् त्याला सेवेतून निलंबित व्हावे लागले आहे. हा प्रकार बुलढाणा जिल्हा पोलिस दलात घडला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बुलढाणा जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेले गजानन खेर्डे (gajanan kherde) यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. खामगाव येथील पोलीस नियंत्रण कक्षात सहायक फौजदार या पदावर ते कार्यरत हाेते. दोन समाजात तेढ निर्माण होईल असा मजकूर त्यांनी समाज माध्यमात पाेस्ट केला. (Maharashtra News)

ही बाब निदर्शनास आल्यावर याची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने ( SP Sunil Kadasne) यांनी खामगाव नियंत्रण कक्षाकडून अहवाल मागविला. पडताळणी नंतर खेर्डे यांना निलंबित करण्यात आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बुलढाणा शहर ठाणेदारांना खेर्डे यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान पोलीस मुख्यालयात पार पडलेल्या नियमित गुन्हे आढावा बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना दक्ष राहण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिले आले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

SCROLL FOR NEXT